गार्डियन ड्रोन खरेदीचा भारताचा मार्ग मोकळा

    दिनांक :03-Feb-2024
Total Views |
वॉशिंग्टन, 
अमेरिकेकडून भारतालाल भेदक आणि घातक अशा Guardian drone सी गार्डियन ड्रोनच्या विक्रीच्या प्रस्तावाला बायडेन प्रशासनाने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबतची अधिसूचना त्यांनी अमेरिकी काँग्रेससमोर सादर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी अमेरिका दौर्‍यात एमक्यू 9 बी सी गार्डियन या मानवरहित विमानांची खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
 
 
Guardian drone
 
त्यानंतरच्या काळात याबाबत करारमदार झाल्यानंतर भारताने 31 सी गार्डियन ड्रोन खरेदी करण्याचे निश्चित केले. काही काळापूर्वी पन्नू या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येच्या कटावरून या करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता बायडेन प्रशासनाने या कराराला हिरवा कंदील दाखवला असून, तशा आशयाची अधिसूचना अमेरिकी काँग्रेसमध्ये सादर केली. Guardian drone यामुळे 31 ड्रोन खरेदीचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे.