सर्पमित्रांचा सत्कार सोहळा

नीलकमल स्मृती फाऊंडेशनचा उपक्रम

    दिनांक :03-Feb-2024
Total Views |
सडक अर्जुनी, 
Sarpamitra felicitation ceremony : येथील नीलकमल स्मृती फाऊंडेशनच्या वतीने तालुक्यातील सर्पमित्रांचा सत्कार सोहळा स्थानिक त्रिवेणी विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
 
sarp mitr 
 
 
सर्पमित्र हे आपले स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपली भूमिका प्रामाणिक व चोखपणे पार पाडतात. त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या निरपेक्ष व नि:स्वार्थी कार्याची दखल घेऊन सर्पमित्रांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नीलेश काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वन परिक्षेत्राधिकारी मिथून तरोणे, मुख्याध्यापक दिलीप चाटोरे, पोलिस नाईक घनश्याम मुळे, सेवानिवृत्त प्राचार्य अनिल मेश्राम, प्रा. डॉ. राजकुमार भगत, मुख्याध्यापिका योगेश्‍वरी पारधी, सृष्टी फाउंडेशनचे सचिव उमेश उदापुरे, पत्रकार प्रभाकर भंडारकर, मो. शाहिद पटेल व कार्यक्रमाचे आयोजक आर. व्ही. मेश्राम उपस्थित होते.
 
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आले. दरम्यान नीलकमल स्मृती फाउंडेशनच्या वतीने सर्प मित्रांना साप पकडण्यासाठी काठी भेट देण्यात आली. तसेच आयोजक आर. व्ही.मेश्राम व आयोजिका प्रज्ञा मेश्राम यांच्या वतीने तालुक्यातील 20 सर्पमित्रांना मान्यवरांच्या हस्ते रोपटे व सन्मानपत्र देऊन ‘सर्पमित्र पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. प्रसंगी साप व अंधश्रद्धा, सापाची ओळख, साप पकडतांनाघ्यावयाची काळजी आदी विषयीची माहिती मुख्याध्यापक तथा सर्पमित्र दिलीप चाटोरे यांनी दिली. कार्यक्रमाचे औचित्य साधून मार्च 2023 च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली निकिता संजय बन्सोड या गुणवंत विद्यार्थीनीचा नीलकमल स्मृती फॉउंडेशनच्या वतीने मान्यवरांच्या तहसिलदार नीलेश काळे यांच्या हस्ते नीलकमल स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
तसेच वनपरिक्षेत्राधिकारी मिथून तरोणे यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक दिलीप चाटोरे यांनी शाल, श्रीफळ व रोपटे देऊन सत्कार केला. प्रास्ताविकेत आर. व्ही. मेश्राम यांनी हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश व राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. संचालन शिक्षक केवळराम शेंडे यांनी केले. आभार मुख्याध्यापिका योगेश्‍वरी पारधी यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक तेजराम मांदाडे, रमेश बनकर, मार्तंड डोंगरवार, आशा मेश्राम, प्रभा मेळे, सर्पमित्र व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.