रामनामाचा महिमा !

Ayodhya-RamLalla भजो रघुनाथ को प्यारे...

    दिनांक :04-Feb-2024
Total Views |
वेध
- अनिरुद्ध पांडे
Ayodhya-RamLalla श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील बालकरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा भारतच नव्हे तर संपूर्ण जगासाठीच एक अभूतपूर्व घटना म्हणून इतिहासात नोंदली गेली आहे. Ayodhya-RamLalla हजारो वर्षांपासून आम्हा भारतीयांचे अपरंपार श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवर रामललाची प्रतिष्ठापना हा गेल्या ५०० वर्षांपासूनचा श्रद्धेचा, भक्तीचा, जिव्हाळ्याचा, अस्मितेचा प्रश्न झाला होता. Ayodhya-RamLalla राम आमच्यासाठी काय आहे, कोण आहे हे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रतिष्ठापना सोहळ्यानंतरच्या भाषणात कसे नेमके सांगितले होते पहा, Ayodhya-RamLalla
राम भारत की आस्था है, राम भारत का आधार है
राम भारत का विचार है, राम भारत का विधान है
राम भारत की चेतना है, राम भारत का चिंतन है
राम भारत की प्रतिष्ठा है, राम भारत का प्रताप है
राम प्रभाव है, राम प्रवाह है, राम नेती भी है, राम नीती भी है
राम नित्यता भी है, राम निरंतरता भी है, राम व्यापक है, विश्व है, विश्वात्मा है..!
 
 
Ayodhya-RamLalla
 
अतिशय समर्पक अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी रामाला या जगासमोर उभे केले आहे. आपले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रामनामाचा महिमा त्यांच्या भजनांमधून, ग्रामगीतेतून वेळोवेळी ठामपणे मांडला आहे. Ayodhya-RamLalla महाराजांचे जसे मराठीवर प्रभुत्व तसेच हिंदीवरही होते. त्यांनी हिंदीतूनही राम, रामराज्य यांच्यावर वेळोवेळी चिंतन केले आहे. ‘मुख रामनाम ले गाओ, पाओगे सुख का धाम । है नाम की महिमा न्यारी, जिने पत्थर को भी तारी ।' अशा शब्दांत राष्ट्रसंतांनी राममहिमा सांगितली आहे. ‘भजो रघुनाथ को प्यारे, सुधारे प्रिय नरकाया । भरोसा है नहीं पलका, पता नहीं क्या करे माया ।।' अशा हिंदी आणि मराठीतील भजनांना ते स्वत: अशा खड्या आवाजात आणि लोकांच्या जिभेवर रुळणाऱ्या लोकप्रिय चालीत गात की ऐकणारा मंत्रमुग्धच होऊन जात असे. Ayodhya-RamLalla ‘मेरे नैनों में रामरूप छाय गयो रे, जहाँ देखूं वहाँ राम ही राम, राम मे मेरा मन भाय गयो रे...' असे सहज सोपे आणि थेट मनात घर करणारे शब्द ही तर तुकडोजी महाराजांची खासियत होती. त्यांच्या मराठी किंवा हिंदी रचना कधी समजावून सांगण्याची गरज पडत नसे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहेच.
 
 
रामनामाने पाषाण तरले, रामनामाने अनेक जन उद्धरिले, वाल्या कोळी रामनामाने ऋषी बनला, अंतकाळी रामनाम घेतले तर मोक्षप्राप्ती होते हे महाराज कसे सांगतात पाहा, Ayodhya-RamLalla
रामनामाचा महिमा, संत जाणताती सीमा । नामे तारिले पाषाण, नामे उद्धारिले जन ।।
वाल्या कोळी ऋषी झाला, बहुत सामर्थ्या वाढला । तुकड्यादास म्हणे नाम, देई अंती निज-धाम ।।
प्रभू श्रीराम सर्वांसाठीच खरोखरच आदर्श आहेत. Ayodhya-RamLalla त्यांच्या स्वभावातील शालीनता, प्रेम, वागण्या-बोलण्यातील सहजता आणि निर्मळता, त्याचबरोबर त्यांची नैतिकता आणि एकनिष्ठता, या सर्व गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. प्रत्येकाच्या जीवनात एक कृष्णासारखा सखा जसा आवश्यक आहे, तसाच मनामनात पुरुषोत्तम प्रभू राम आवश्यक आहे हे महाराज ठिकठिकाणी सांगतात, लिहितात.Ayodhya-RamLalla
रघुपती राघव राजाराम । पतीत पावन सीताराम। म्हणावे गायकाने प्रथम । मग म्हणावे सर्वांनी ।।
असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या अजरामर ‘ग्रामगीते'त राम महिमा सांगताना म्हणतात.
 
 
 
४१ अध्याय आणि ४६०० पेक्षा अधिक ओव्यांनी ही ‘ग्रामगीता' संपन्न आहे.
हाती उद्योगाचे साधन । मुखी रामनामाचे चिंतन। हाची धर्म आहे महान । गावकरी लोकांचा ।।
अशा सोप्या शब्दांत महाराज लोकांचा धर्म ग्रामगीतेतून समजावून सांगतात. ‘रामचंद्रे राज्य त्यागिले । रावणा संहारूनि सज्जन रक्षिले । म्हणोनीच अवतार ठरले । सर्वतोमुखी ।' असेही गुरुदेव ग्रामगीतेत सांगतात. Ayodhya-RamLalla एकीकडे आपण शूरवीर रामाची भक्ती करावी, पण रामासारखे होऊ नये हे त्यांना खटकते. ‘रामे असुरांशी मर्दावे । आम्ही पूजापान अवलंबावे । निर्बल होवोनि शरण जावे । ही भक्ती कैचि?' अशा शब्दांत ते रामभक्तांना विचारतात. गुरुदेवांच्या भजनांमध्येही वारंवार रामजप असतो, ते म्हणतात,
अहल्या शिळा स्पर्शता मुक्त झाली । महाकीर्ती ही व्यापली, कर्णी आली ।।
किती भक्त हे तारिले रामनामी । म्हणोनी प्रभु, शरण आलो तुला मी ।।
किंवा वेगळ्या शैलीतील, राम जयाचे हृदयी राहे
त्यास भीती कवणाची हो...अशाश्वता टाकुनी दृष्टी घे,Ayodhya-RamLalla
सर्व सत्यस्वरूपाची हो..।
९८८१७ १७८२९