आ. गणपत गायकवाड यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा

    दिनांक :04-Feb-2024
Total Views |
-द्वारली गावातील शेतकर्‍याची तक्रार
 
ठाणे, 
अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वादातून कल्याण पूर्वचे भाजपा आमदार Ganpat Gaikwad गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली. आता त्यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. द्वारली गावातील जाधव नावाच्या शेतकर्‍याने गायकवाड यांच्यासह सात जणांविरुद्ध हिललाईन पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.
 
 
Ganpat
 
अंबरनाथ तालुक्याच्या महसुली हद्दीतील द्वारली गावात कुटुंबीयांच्या जमिनीचा वाद सुरू होता. हा वाद न्यायालयात गेला होता. वादाचा निकाल गायकवाड यांच्या बाजूने लागला होता. नंतर गायकवाड यांनी संबंधित जमिनीला संरक्षण भिंत बांधायला सुरुवात केली. यावेळी गायकवाड यांनी जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप शेतकर्‍यांनी केला होता. द्वारली गावातील नीता जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 31 जानेवारी रोजी Ganpat Gaikwad गणपत गायकवाड आणि इतरांनी आमच्या जागेवर संरक्षण भिंतीचे काम सुरू केले. आम्ही त्यांना जाब विचारला तेव्हा गायकवाड यांनी आम्हाला मारण्यासाठी फावड्याचा दांडका उचलला. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ केली.