नासाने शोधली ‘सुपर अर्थ’

    दिनांक :04-Feb-2024
Total Views |
- राहण्यायोग्य ग्रह 137 प्रकाशवर्षे दूर
 
वॉशिंग्टन, 
अमेरिकी अंतराळ संस्था NASA Discovers 'Super Earth' नासाने सुपर अर्थ शोधली असून, या ग्रहावर जीवन शक्य असल्याचे नासाने म्हटले आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 137 प्रकाशवर्षे दूर आहे. या सुपर अर्थची पुढील माहिती घेतली जात आहे. हा ग्रह एका लहान कक्षेत असून, तो लाल तार्‍याला प्रदक्षिणा घालत आहे. खगोलशास्त्रीय मानकांचा विचार केल्यास तो आपल्या जवळ म्हणजे 137 प्रकाशवर्षे दूर आहे. त्याच प्रणालीमध्ये पृथ्वीच्या आकाराचा दुसरा ग्रहही असू शकतो, असे नासाने म्हटले आहे.
 
Super Earth
 
NASA Discovers 'Super Earth' : या ग्रहाला टीओआय-715 बी असे नाव देण्यात आले आहे आणि तो पृथ्वीच्या सुमारे दीडपट आहे. त्याच्या मूळ तार्‍याभोवती योग्य कक्षेत तो परिभ्रमण करीत आहे. कदाचित त्याच्या पृष्ठभागावर पाणी असू शकते. तो त्याच्या कक्षेतील भ्रमण केवळ 19 दिवसांत पूर्ण करतो. म्हणजेच त्याचे वर्ष केवळ 19 दिवसांचे आहे, असे नासाने म्हटले आहे. पृष्ठभागावरील पाण्यासाठी विशेषत: अनुकूल वातावरणासाठी अनेक घटकांचा निश्चितपणे अभ्यास करावा लागले. लहान ग्रह कदाचित पृथ्वीपेक्षा किंचित मोठा असू शकतो आणि तो कदाचित राहण्यायोग्यही असू शकतो, असे नासाने सांगितले. हा ग्रह एका लहान ग्रहाभोवती फिरतो, जो सूर्यापेक्षा लहान आणि थंड आहे. याप्रमाणे असे अनेक तारे लहान खडकाळ तारे आढळतात. हे ग्रह आपल्या सूर्यासारख्या तार्‍यांभोवती जास्त प्रदक्षिणा करतात. परंतु, येथे लाल लहान ग्रह असल्याने आणि तो थंड असल्याने ग्रह जवळ येऊ शकतात, तरी ते सुरक्षित अंतरावर राहू शकतात. तंग कक्षांचा अर्थ म्हणजे त्या कक्षांमध्येही तारे योग्य पद्धतीने परिक्रमा करतात, असे नासाने म्हटले आहे.
 

टीईएसएसने लावला ग्रहाचा शोध
हा नवीन ग्रह ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईटने (टीईएसएस) शोधला आहे. कक्षा पूर्ण करण्याच्या कमी कालावधीमुळे वैज्ञानिकांना ग्रह शोधण्यात आणि त्याचा अभ्यास करण्यास मदत मिळाली. जेम्स वेब दुर्बिणीद्वारे ग्रहाची पडताळणी करण्याची योजना नासाने आखली आहे. यातील बरेच काही ग्रहाच्या गुणधर्मावर अवलंबून असेल, असे नासाने स्पष्ट केले.