घाटे अळीमुळे हरभरा पीकही घाट्यात

    दिनांक :04-Feb-2024
Total Views |
उंबर्डा बाजार,  
ghat worm परिसरातील शेतकर्‍यांनी यंदा शिल्लक पाण्यावरच रब्बीची पेरणी केली. मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अळीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी औषधी फवारणी करीत आहे. खरिपात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांनी रब्बीत उसनवारी करून पेरणी केली.
 

krushi vishva 
 
मात्र संकटाची मालिका संपत नसल्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कृषी विभागाने शेतकर्‍यांना या बाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.यंदा सुरुवातीपासूनच निसर्गाची अवकृपा राहिली आहे. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढण्याचे शेतकर्‍यांचे नियोजन असते. यंदा बहुतांश शेतकर्‍यांनी विहिरीतील जेमतेम पाण्यावर गहू, हरभरा, मका, ज्वारी, मोहरीसह इतर पिकांची पेरणी केली.ghat worm मात्र या पिकाला बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढला असून हरभरा पिकातून अपेक्षित उत्पादन हाती न लागण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.