बुद्धिभेदाचे नवे कथानक !

narrative-setting-India महिला विरोधी प्रवृत्तीचे दहन

    दिनांक :04-Feb-2024
Total Views |
कानोसा 
 
- अमोल पुसदकर 
 
narrative-setting-India चंद्रपूर, गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये तसेच महाराष्ट्राच्या इतरही भागात एक बुद्धिभेदाचे नवीन कथानक रचले गेले आहे व ते म्हणजे रावणाचे आडनाव मडावी होते. हे कथानक रचणारे जे लोक आहेत त्यांना आदिवासी समाजाला हिंदू धर्मापासून तोडण्याचे काम करायचे आहे. narrative-setting-India वास्तविक पाहता आदिवासी समाज हा अतिशय शांतता प्रिय समाज आहे. देशभक्त समाज आहे. अगदी रामायण, महाभारतापासून या समाजाचे अस्तित्व राहिलेले आहे. रामायणामध्ये सुद्धा निषादराज गूह याची प्रभू रामचंद्रांशी वनवासाच्या सुरुवातीला भेट झाली व त्यांच्यामध्ये मित्रता झाली. narrative-setting-India त्यावेळेस या निषादराज गूह यांनी प्रभू रामचंद्रांकडून वचन घेतले की तुम्ही वनवास संपवून ज्या वेळेला अयोध्येला परत जाल त्यावेळेला तुम्ही मला भेटल्याशिवाय जाऊ नये आणि प्रभू रामचंद्रांनी सुद्धा रावणवधानंतर ज्यावेळेस ते अयोध्येला परत जात होते त्यावेळेस त्यांनी निषादराज गूह यांची भेट घेतलेली आहे. narrative-setting-India प्रभू रामचंद्र यांची दुसरी भक्त म्हणजे शबरी, जिने दिलेली उष्टी बोरं सुद्धा प्रभू रामचंद्रांनी मोठ्या प्रेमाने खाल्ली होती.
 
 

narrative-setting-India 
 
 
१४ वर्षांच्या वनवासाच्या काळामध्ये ते वनामध्ये राहणाऱ्या वनवासी ज्यांना आज आपण आदिवासी म्हणतो अशा लोकांसोबत राहिले होते. रावण सोन्याच्या लंकेत राहत होता व प्रभू रामचंद्र जंगलात राहणाऱ्या आदिवासींसोबत १४ वर्षे राहिले हे आपण लक्षात घेतले पाहिजे. वानरांसोबत सुद्धा त्यांनी मैत्री केली व त्यांच्या साह्याने त्यांनी रावणावर विजय मिळविला. narrative-setting-India आदिवासी समाजाने इंग्रजांच्या विरोधात सुद्धा लढाई लढलेली आहे. देशाच्या स्वातंत्र्यांमध्ये सुद्धा त्यांचे योगदान राहिलेले आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या विरोधात दिलेला लढा आपल्याला माहीत असेलच. परंतु अशा समाजाला हिंदू धर्मापासून तोडण्याचे कारस्थान काही समाज विघातक लोक करीत असतात. हेच लोक रावण दहनाचा विरोध करतात. रावणाचे दहन म्हणजे अन्यायी, अत्याचारी महिला विरोधी प्रवृत्तीचे दहन आहे. narrative-setting-India याला या देशात राहणाऱ्या कुठल्याही धर्माच्या, पंथाच्या व्यक्तीने विरोध करण्याचे काहीच कारण नाही. रामायणामध्ये रावणाचा उल्लेख तो ज्ञानी होता, विद्वान होता, ब्राह्मण होता, सर्व शास्त्रांचा ज्ञाता होता अशा पद्धतीचा आहे. रावण ब्राह्मण होता तरीही भारतात राहणाऱ्या ब्राह्मण समाजाने कधीही रावणाची बाजू घेतली नाही व रावण दहनाला सुद्धा विरोध केला नाही. कारण रावणाचे कर्म हे समर्थनीय नव्हते.
 
 
narrative-setting-India आता काही समाजविघातक लोक आदिवासी समाजामध्ये रावण हा मडावी होता म्हणजे आदिवासी होता तो आमचा देव होता म्हणून आम्ही त्याचे दहन करू देणार नाही असा दुष्प्रचार करतात. रामायणामध्ये रावणाने सीतेचे हरण केले याचा उल्लेख आहे. रावणाने त्याचा भाऊ कुबेर याच्या सुनेवर सुद्धा अत्याचार केल्याचा उल्लेख आहे. एका अप्सरेवर सुद्धा अत्याचार केल्याचा उल्लेख आहे व तिच्याच शापाने तो ग्रस्त होता हे सुद्धा सांगितलेले आहे. narrative-setting-India जे लोक रावण हा मडावी होता असा दुष्प्रचार करतात ते लोक त्याचा सख्खा भाऊ विभीषण हा सुद्धा मडावी होता असा प्रचार का करीत नाही? विभीषण तर धार्मिक होता, सत्यवचनी होता, रामाचा भक्त होता या लोकांना जर कोणाला देव म्हणायचे असेल तर रावणाला देव मानण्यापेक्षा ते विभीषणाला सुद्धा देव मानू शकतात कारण त्याचे आचरण चांगले होते. narrative-setting-India रावणाचा भाऊ कुबेर हा तर देवांचा खजिनदार होता. मग असे असताना कुबेराची पूजा का नको? हिंदू समाज तर आरतीनंतर जी मंत्र पुष्पांजली होते त्यामध्ये म्हणतो कुबेराय वैश्रवणायाम महाराजाय नम:. विभीषणाची पूजा का नको? फक्त रावणाचीच पूजा हवी आणि ती सुद्धा का तर रावण हा रामाचा शत्रू होता म्हणून !
 
 
बुद्धिभेद करणाऱ्यांना आदिवासी समाजाला रामापासून तोडायचे आहे. narrative-setting-India हिंदू धर्मापासून तोडायचे आहे. म्हणून हे लोक रावण हा देव होता असा प्रचार करीत आहे. ज्या काळामध्ये प्रभू श्रीरामचंद्र होऊन गेले त्या काळामध्ये आजच्यासारखे आडनाव लावण्याची पद्धती नव्हती. रावणाला सुद्धा कुठले आडनाव नव्हते व रामाला सुद्धा कुठले आडनाव नव्हते. असे असताना केवळ समाजाचा बुद्धिभेद करण्यासाठी रावण मडावी होता अशा पद्धतीचे तत्त्वज्ञान मांडले जाते. हे खूपच हास्यास्पद आहे व समाजाचा बुद्धिभेद करणारे आहे. कुठलेही पुरावे, संदर्भ, आधार न देता मनाला जे वाटेल ते लिहिणे व व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक इत्यादी माध्यमातून ते विशिष्ट समाजाच्या ग्रुपर पाठविणे व त्यांच्यामध्ये बुद्धिभेद निर्माण करणे असे कार्य चालू असते. narrative-setting-India नुकतीच एका आदिवासी समाजाच्या विवाह विषयक ग्रुपमधील एक पोस्ट वाचण्यात आली. त्यामध्ये लिहिले होते की मोदी, शाह हे ब्राह्मण आहेत. मोदी कुठे ब्राह्मण आहे? मोदी तर ओबीसी समाजाचे आहेत. पुढे लिहिले होते की मोदी, शाह यांना अदानी, अंबानी यांनाच फक्त मोठे करायचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झालेी आहेत. या ७५ वर्षांमध्ये द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनविण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. narrative-setting-India म्हणजे आदिवासी समाजाचा खरा सन्मान जर कोणी केला असेल तर तो नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. परवाच्या अर्थसंकल्पामध्ये जी लखपती दीदी नावाची योजना मांडली आहे, त्यामध्ये भारतातील दोन करोड महिला ज्या आर्थिक दुर्बल आहेत, त्यांना लखपती बनविण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आलेले आहे.
 
 
असे असताना मोदी फक्त अंबानी आणि अदानी यांचा विचार करतात असे म्हणणे कितपत योग्य आहे. narrative-setting-India त्यामध्ये पुढे लिहिले होते की मोदी, शाह हे ईव्हीएममध्ये गडबड करून पुन्हा एकदा निवडणुका जिंकण्याचे कारस्थान करीत आहेत. मोदी जेव्हा पंतप्रधान नव्हते, त्याच्या आधी काँग्रेसने या ईव्हीएमचा वापर सुरू केला. त्यावेळेस काँग्रेस सत्तेवर होती. आजही कर्नाटक, हिमाचल आणि तेलंगणा या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. जर ईव्हीएममध्ये फेरफार केलेला असता तर या राज्यांमध्ये तरी काँग्रेसला का बरं जिंकू दिले असते. दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये आम आदमी पार्टी याच ईव्हीएम मशीनचा वापर करून सातत्याने कशी जिं कू शकली असती. narrative-setting-India यावरून असे लक्षात येते की भाजपा जिंकली तर ईव्हीएममध्ये फेरफार करून जिंकली आणि काँग्रेस जिंकली तर मग ईव्हीएम बरोबर होत्या अशा पद्धतीचा दुहेरी न्याय लावण्याचे कार्य काही संघटना व लोक करीत आहेत. हे सर्व समाजामध्ये बुद्धिभेद निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. समाजामध्ये असे नवनवीन कथानक पेरण्याचे कार्य जे लोक व संघटना करतात व समाजामध्ये भेद निर्माण करण्याचे काम करतात अशा समाजविघातक आणि राष्ट्रविघातक शक्तींना ओळखले पाहिजे. narrative-setting-India समाज माध्यमांवर, वृत्तपत्रांमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची चर्चा असेल त्या त्या ठिकाणी या बुद्धिभेद करणाऱ्यांच्या बुद्धीला मुंग्या आणणारे प्रश्न उपस्थित केले गेले पाहिजे. त्यांचे खरे चेहरे, लपलेले स्वार्थ, समोर आणण्याचे कार्य जागृत समाजाला करावे लागेल व यातच समाजाचे हित आहे.