- यवतमाळ जिल्ह्यातील 2684 शिक्षकांचा सहभाग
यवतमाळ,
यवतमाळ जिल्हा परिषद व अर्पण संस्था, मुंबईच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी Bal Shoshan Pratibandha ‘बाल लैंगिक शोषणास’ प्रतिबंध करणार्या वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 8 फेब्रुवारीपर्यंत चालणारी ही मोहिम, कार्यरत असलेल्या शाळांमध्ये वैयक्तीक सुरक्षा शिक्षण लागू करू शकेल, पालक व प्रौढ भागधारकांसह या विषयावर सत्र आयोजित करू शकतील. तसेच मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी या मोहिमेची मदत होणार आहे.
Bal Shoshan Pratibandha : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, दारव्हा उमरखेड, पुसद व वणी तालुक्यातील शिक्षकांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. प्रशिक्षण 1 फेब्रुवारीपासून सुरू झाले असून 8 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत होणार आहे. यात जवळपास 2 हजार 663 शिक्षक सहभागी होणार आहेत. या प्रशिक्षणासाठी अर्पण संस्थेचे तज्ञ प्रशिक्षक कुसुम नाईक, शंकर गवस मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाला प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी प्रशिक्षण समन्वयक प्रवीण सोनोने, सहायक बाबुसिंह राठोड, गटशिक्षणाधिकारी विलास जाधव यांचे सहकार्य मिळाले आहे.