सुशासन हा आमच्या सरकारचा पाया : मुख्यमंत्री

    दिनांक :05-Feb-2024
Total Views |
- राज्याच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन

मुंबई, 
सुशासन हा आमच्या सरकारचा पाया आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहोचण्यासाठी सुशासन निर्देशांक यासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत. जिल्हा सुशासन निर्देशांकामुळे जिल्ह्यांमध्ये सर्वांगीण विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होणार आहे. यातून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या समान विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे. या निर्देशांकात चांगली कामगिरी करून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
 
 
CM Eknath Shinde
 
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या 2023-24 वर्षाच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी CM Eknath Shinde मुख्यमंत्री म्हणाले की, शासन आणि जनता यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत. ‘शासन आपल्या दारी’ सारख्या उपक्रमातून सरकार थेट जनतेपर्यंत आपण नेत आहोत. कोट्यवधी लोकांना शासकीय योजनांचे लाभ आपण याद्वारे दिले आहेत. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला बळ देणारी या निर्देशांकांची संकल्पना आहे. यातील 10 क्षेत्राच्या गुणांकनात प्रत्येक जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्यास सर्वसामान्यापर्यंत शासकीय योजना-लाभ प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. याचा विचार करून सर्व जिल्हाधिकार्‍यांनी आपला जिल्हा सुशासन निर्देशांकात अग्रेसर कसा राहील, यासाठी काम करावे. यातूनच जनतेच्या मनात हे आपले सरकार आहे, असा विश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा सुशासन निर्देशांकाच्या संकेतस्थळाचे आणि सुशासन अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.