घातक संस्कृतिहीन काँग्रेस

Congress and Hindu देश वाळवीसारखा पोखरला

    दिनांक :05-Feb-2024
Total Views |
वेध
- चंद्रकांत लोहाणा
Congress and Hindu या देशाचा खरा आणि कट्टर शत्रू जर कोणी असेल तर तो काँग्रेस पक्ष होय. सत्ता आणि संस्कृती याचा मेळ घालताना काँग्रेस पक्षाने नेहमीच राष्ट्रप्रेमाला तिलांजली देत सत्तेला व घराणेशाहीला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. या देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेस पक्षाने भारतीय संस्कृतीला सदैव पायदळी तुडविण्यात धन्यता मानली. Congress and Hindu लोकशाहीला पायी तुडविले. हिंदूंना कायम पाण्यात बघितले. त्यांना सदैव दुय्यम दर्जा दिला. मताच्या लांगूलचालनापायी प्रभू श्रीराम हे काल्पनिक पात्र आहे, हे म्हणण्यापर्यंत काँग्रेसने मजल मारली. Congress and Hindu या देशाचा आत्मा असणाऱ्या श्रीरामाला नाकारणाऱ्या काँग्रेस पक्षाला २०१४ साली जनतेने धडा शिकवून चांगलीच अद्दल घडविली. काँग्रेसमुक्त देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना जनतेने स्वीकारून काँग्रेस पक्षाला कायमचा धडा शिकविला. Congress and Hindu भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांनी या देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजविली, त्यांना स्वतःच्या संस्कृतीविषयी लाज वाटायची.
 
 

Congress and Hindu 
 
 
त्यांना या देशामधील धार्मिक स्थळांचे महत्त्व कधीच समजले नाही. राजकीय अपरिहार्यतेमुळे त्यांनी आपल्या संस्कृतीचा कधीच सन्मान केला नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर गुवाहाटी येथे केली. उज्ज्वल भारताच्या भविष्याची पायाभरणी परंपरा, संस्कृती व वारशांकडे दुर्लक्ष करून कदापिही शक्य नाही; हे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणून आहेत. Congress and Hindu येथील नागरिकांचाही यावर ठाम विश्वास आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली असून बेताल झालेल्या काँग्रेस पक्षाला काय करावे, हे सुचेनासे झाले आहे. हजारो वर्षांपासून आव्हाने कायम समोर उभी राहिली असली, तरी अशी ठिकाणेच आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. आपणच त्यांचे संवर्धन करायलाच हवे. यापूर्वीच्या सत्ताधाèयांनी या संस्कृतीकडे व वारशांकडे कधीच लक्ष दिले नाही. Congress and Hindu कारण त्यांना एका विशिष्ट समुदायालाच खुश ठेवायचे होते. त्यांना फक्त आपला स्वार्थ साधायचा होता. आपली संस्कृती हाच आपला भूतकाळ असल्याने भूतकाळ विसरून कोणताही देश भविष्यामध्ये विकास करू शकत नाही, असा खरमरीत टोलाही नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे.
 
 
 
नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाला कितीही बाळकडू पाजले तरी तो पक्ष सुधरेल, याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे जे वाटोळे व्हायचे होते, ते झाले आहे. भारतीय जनतेचा विश्वासही काँग्रेसने गमावला आहे. राष्ट्र व जनता यांच्याप्रति काँग्रेसने केलेला विश्वासघातच काँग्रेस पक्षाला एका अंधाऱ्या खाईत घेऊन गेला आहे. Congress and Hindu भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनतेने घेतलेला निर्णय किती समर्पक आहे, हे २०१४ नंतर सिद्ध झाले आहे. देशाचा सर्वांगीण विकास आणि आपल्या प्राचीन संस्कृतीचे संवर्धन यावर नरेंद्र मोदी यांनी विशेष भर देऊन संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीची ताकद आणि विश्वसनीयता दाखवून दिली आहे. Congress and Hindu २०१४ पूर्वीच्या भारत आणि त्यानंतरचा भारत यामधील फरकही जनतेच्या चाणाक्ष नजरेने टिपला असून संपूर्ण जगाला गवसणी घालण्याची क्षमताही या संस्कृतीमध्ये असल्याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रत्येक नागरिकाला करून दिली आहे. या देशावर सर्वाधिक काळ एकाच घराण्याकडे सत्ता राहिल्याने देश वाळवीसारखा सतत पोखरत राहिला; हे सत्यही विसरून चालणार नाही.
 
 
परंपरा आणि संस्कृतीला काँग्रेस पक्षाने फारकत दिल्यामुळे भारताची जी अधोगती झाली त्यास काँग्रेसचा अक्षम्य अपराध जनतेने ठरविला. त्या अपराधाची शिक्षाही जनतेने त्या पक्षास ठोठावली. केलेल्या प्रत्येक कर्माचा भोग प्रत्येकाच्या वाट्याला येतो, असा हा कर्माचा सिद्धांत काँग्रेस पक्ष विसरला. Congress and Hindu महाभारताच्या पर्वात धृतराष्ट्र आणि दुर्योधनही विसरले होते. त्यावेळी पांडवांनी भगवान श्रीकृष्णाच्या साहाय्याने हिशेब बरोबर केला. अंधारी रात्र संपल्यावर पहाट होतेच हा निसर्गाचा अलिखित नियम काँग्रेस जरी विसरली असली, तरी उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नपूर्तीसाठी नरेंद्र मोदी विसरले नाहीत, हे भारताचे भाग्यच म्हणावे लागेल. अयोध्या येथील रामललाचे मंदिर हे त्याचे ताजे उदाहरण आहे.
 
९८८१७१७८५६