बुलढाणा,
Dhangar Samaj : राज्यात धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणी बाबतीत दिवसेंदिवस भावना तीव्र होत आहेत. धनगर समाज आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक परीस्थिती बिकट आहे. राज्यघटनेत या समाजाची नोंद अनुसूचित जमातीमध्ये असून आतपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. आणि या समाजाला अनूसूचित जमातीचे कुठलेही लाभ मिळाले नाही. त्यामुळे या समाजाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि बिकट झालेली आहे. यासाठी अनेक वर्षापासून लोकशाही मार्गाने संषर्घ सुरु असून आमचे हक्क आम्हाला मिळाले नाही.
दि. 29 जानेवारी रोजी पासून सकल Dhangar Samaj धनगर समाज महाराष्ट्र यांच्या वतीने नंदूभाऊ लवंगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आमरण उपोषणाला बसलेले आहे. या उपोषण मंडपाला उबाठा सेनेचे जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत तालुका अध्यक्ष लखन गाडेकर यांनी पाठिंबा दिला आहे. या उपोषणात माजी आ. नानाभाऊ कोकरे व शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.