गोंदिया जिपच्या मुकाअ पदी मुरुगनथम एम.

    दिनांक :05-Feb-2024
Total Views |
गोंदिया,
Gondia Murugantham M. : चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक अधिक कार्यरत असलेले मुरुगनथम एम. यांची गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. येथील जिल्हा परिषदेत कार्यरत मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांची मुंबई येथील हाॅपकीन संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर स्थलांतरण करण्यात आले आहे.
 
Gondia Murugantham M.
 
सोमवार 5 फेबुवारीला यासंबंधीचे आदेश शासनाने जारी केले आहे. Gondia Murugantham M. मुरुगनथम एम. हे 2020 च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. ते चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यापुर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे. परिविक्षाकालावधी झाल्यानंतर त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पहिल्यांदाच गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.