औदासीन्य दूर व्हावे...!

Politics-voting-Elections उदासीनतेचा तळ गाठला

    दिनांक :05-Feb-2024
Total Views |
दखल
- सुनील काथोटे
Politics-voting-Elections लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहेत, तसतसे वातावरण ढवळून निघत आहे. राहुल गांधी यात्रेवर आहेत, मोदी सरकारवर प्रहार करीत आहेत. त्याचवेळी पंतप्रधान मोदी हे विकासाची नवनवी शिखरं गाठण्याची भाषा बोलत आहेत. गेल्या दहा वर्षांत मोदींच्या नेतृत्वात देशाने अफाट प्रगती केली आहे. Politics-voting-Elections जगाने तोंडात बोटे घालावीत एवढे उत्तुंग यश भारताने मोदींच्या नेतृत्वात मिळविले आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीत पुन्हा एकदा उत्सव येऊ घातला आहे. तो मतदानोत्सव आहे. एप्रिल आणि मे महिन्यात आपल्या सगळ्यांना लोकसभा निवडणुकीत न चुकता मतदान करायचे आहे. Politics-voting-Elections ‘सामान्य माणूस लोकशाहीत देशाला काय देऊ शकतो? तर अत्यंत जागरूकतेने तो मतदान करू शकतो. तो जितके सुदृढ मतदान करेल तितकी त्याची सत्ता बळकट होत जाईल!' पण, दुर्दैवाने जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीत मतदान करा, असे आवाहन करावे लागते. अजूनही अत्यंत सुबुद्ध आणि उच्चभ्रूंच्या वस्तीतच कमी मतदान होते. Politics-voting-Elections शहरी भागांत मतदानाची टक्केवारी कमी असते आणि आदिवासींसारख्या दुर्गम भागांत मतदानाची टक्केवारी बरीच जास्त असते.
 
 

Politics-voting-Elections 
 
 
साधारणत: ६० टक्क्यांच्या आसपास सरासरी मतदान होते आणि त्यातल्या ३०-३५ टक्क्यांचे मतदान पदरी पडलेले सत्ताधारी होतात. जवळपास तितकेच टक्के लोक ज्यांना मतदानाचा अधिकार आहे असे हे लोक त्या प्रक्रियेपासून दूर असतात. म्हणजे सत्ता स्थापन करण्यास कारणीभूत लोकांइतकेच लोक या प्रक्रियेबाबत उदासीन असतात. मधल्या काळांत आणिबाणीचे काळे पर्व पाहिल्यानंतर आणि बऱ्यापैकी जनजागृतीचे प्रयत्न केल्यावरही ७५ वर्षांची ही लोकशाही व्यवस्था मतदारांत प्रज्वलित झालेली नसेल तर या व्यवस्थेत आपण कुठे चुकलो हे समजून घेतले पाहिजे. Politics-voting-Elections लोकशाही व्यवस्था ही वरवर पाहता पाश्चात्त्य जगांतलीच वाटत असली तरीही भारतीय सांस्कृतिक विचारधारेचा मूलाधार हा लोकशाहीचाच राहिला आहे. संकल्पना म्हणून तिचा औपचारिक उद्घोष करण्यात आला नव्हता. कारण ती जीवनपद्धती होती. राजेशाहीच्या पर्वातून नंतर गुलामगिरीत असताना रयतेचे राज्य आणण्यासाठी अन् ते राबविण्यासाठी अनेक राजांनी लढा दिलेला आहे. म्हणूनच राजेशाही व्यवस्था ही कधी गुलामीची वाटली नाही. मोगलांची परकी सत्ता होती, तिथून रयतेच्या मतांना किंमत राहिली नाही. ‘हम करे सो कायदा' अशी यवनांची वृत्ती होती.
 
 
Politics-voting-Elections नंतर इंग्रजांनी त्याच्याही पलीकडची मजल गाठली. त्यांना या देशात माणसे राहतात, त्यांच्यावर आपण राज्य करतो, हे मान्यच नव्हते. सुपीक असा एक भूभाग आपण राणीच्या आधिपत्याखाली आणला आहे, अशीच त्यांची धारणा होती. पारतंत्र्य म्हणजे तुम्हाला मतच नसणे, माणूस म्हणून तुम्हाला मान्यताच नसणे. ही गुलामी झाली. मोगलांनी भारतीयांच्या मतांना किंमत दिली नाही अन् इंग्रजांनी या देशातल्या लोकांना मत असते हेच मान्य केले नाही. स्वातंत्र्याचा लढा हा मतस्वातंत्र्याचाच होता. मताधिकारासाठीच तो होता. लोकशाही व्यवस्थेच्या स्थापनेचा तो लढा होता. मोठ्या प्रयत्नांनी तो मिळविला. त्यासाठी अनेकांनी बलिदान केले. त्या अधिकाराचा वापर आपण न करणे हा त्या बलिदानांना व्यर्थ ठरविणेच आहे. म्हणून आपण मतदान करायलाच हवे. Politics-voting-Elections मतदानासाठी जनजागृती करण्याची मोहीम प्रशासनाच्या माध्यमातून राबविली जात आहे. निवडणुकीतील प्रत्यक्ष प्रचारापेक्षा मतदानासाठी जागृतीचा हा प्रचार जरा जास्तच असतो. आम्हाला किंवा आमच्याच पक्षाला मतदान करा, असे सांगण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रचारापेक्षाही कुणालाही करा; पण मतदान करा, हे सांगण्यासाठी जास्त पैसा, वेळ, व्यवधानं आणि मनुष्यशक्ती खर्च केली जात असावी. असे असूनही परिणाम मात्र दिसत नाही.
 
 
किमान सत्तर टक्क्यांच्या पार मतदान जायला हवे ते जात नाही. मतदारांच्या मतदानाबद्दल असलेल्या उदासीनतेचा तळ गाठला पाहिजे. हे खरेच आहे की राजकारण या प्रकाराबद्दलच जनतेच्या मनांत निर्माण होणारा तिटकारा, नकोसेपण मोठे आहे. Politics-voting-Elections त्याला आजवर ज्या पद्धतीचे राजकारण करण्यात आले तेही कारणीभूत आहेच. नैतिकता, विशुद्धपणा, प्रामाणिकपणा यांच्याशी फारकतच घेतलेले राजकारण बहुतांश प्रमाणात अनुभवास आलेले आहे. काहीही करून तेच ते अनुभव गाठीस येतात. राजकारण हे भ्रष्टाचाराचे उगमस्थान आहे. निवडणुका खर्चीक झाल्या अन् म्हणून तिथे खर्च झालेला पैसा नंतर सत्तेतून वसूल करण्याचे प्रकार सुरू झाले. यातून मग अगदी साध्या नगरसेवकाचीही झालेली इमारत अन् गाडी पाहून सामान्य लोकांना अनेक प्रश्न पडतात. कुठल्याच सत्तेला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. Politics-voting-Elections त्यामुळे सामान्यांच्या या प्रश्नांची उत्तरे मिळणे हा नंतरचा भाग झाला, ते हा प्रश्न अगदी निवडणुकीच्या काळातही विचारू शकले नाहीत. त्यामुळे ती चीड कायम राहिली आणि मग त्यातून नकोच त्या निवडणुका अन् नकोच ते मतदान, अशी मानसिकता तयार झाली. म्हणजे आम्ही मते द्यायची आणि तुम्ही मग पाच वर्षे माल खायचा, हे मान्य नसलेले लोक मतदान करीत नाहीत.
 
 
देशातले राजकारण एकदम निर्मळ तर होऊ शकत नाही. त्या दिशेने किमान प्रवास सुरू करता येतो आणि तो बऱ्यापैकी सुरू झालेला आहे. त्यामुळे राजकारणात उच्चविद्याविभूषित व्यक्तीही येण्यास आता चांगली सुुरुवात झाली आहे. राजकारणाची शुचिता हे कारण असले तरीही जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केले तर वचक अधिक वाढू शकतो. Politics-voting-Elections रास्त मार्गांना फाटा देत इतर मार्गांनी मतदान घेणाऱ्यांना याचा फटका बसू शकतो. वाढते मतदान हे राजकारण आणि प्रशासन, सत्ता यांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू करणारे असेल. त्यासाठी तरी मतदान करायलाच हवे. नेमके कुणाला करायचे मतदान हा मतदारांचा प्रश्न आहे. दगडापेक्षा वीट मऊ असे कुणालातरी निवडावे लागते. पर्यायांचा शोध घेता येईल आणि मतदार शुद्ध राहिला तर राजकारणही शुद्ध होईल. अर्थात हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारतीय लोकशाहीला आणखी बराच प्रवास करावा लागणार आहे. निवडणुकीतील मुद्यांचाही विचार करावा लागेल. जास्तीत जास्त लोक मतदान करायला लागतील तर ते सर्वंकष विचार करू लागतील, चर्चेत सहभागी होतील.
 
 
Politics-voting-Elections मतदान करायचेच नाही, असे ठरविले असल्याने मग त्यावरही विचारही केला जात नाही. हे जास्त भीषण आहे. देशातले किमान ४० टक्के सुजाण लोक राजकीय प्रक्रियेबाबत विचारही करत नाहीत, हे लोकशाहीचे अपयश मानले पाहिजे. त्यामुळे शासन आणि प्रशासनावर वचकही ठेवला जात नाही. अलिकडे ‘नोटा'चा पर्याय दिला गेला आहे. समोर असलेले सगळेच पर्याय नालायक आहेत, या निर्णयावर आलेले मग नोटाचा वापर करू शकतात. तो अलिकडे वाढला आहे. निषेध करण्यासाठी नोटाचा वापर केला जाऊ नये. Politics-voting-Elections निवडून दिलेल्यांकडून तुम्ही कामे करवून घ्यायची असतात. आमचे म्हणणे ऐकले नाही म्हणून मग आम्ही नोटाचा वापर करू, ही धमकी योग्य नाही. या लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी आपण या देशांतली सामान्य माणसे एकच गोष्ट करू शकतो आणि ते आहे मतदान... आपल्याला १०० टक्के मतदानाचे शिखर गाठायचे आहे! सध्या मोदींच्या रूपाने देशाला सक्षम नेतृत्व लाभले आहे. कुणाला मतदान करावे, हा प्रश्न राहिलेला नाही. असे असले तरी तुम्हाला मोदी पसंत नसतील तरी मतदान हे करायलाच नवे आणि त्यासाठी आधी मतदार यादीत नाव समाविष्ट करायला हवे.
९८८१७१७०९१