भारतीय जवानांचा पहिला गट 10 मार्चपूर्वी पाठवणार

    दिनांक :05-Feb-2024
Total Views |
- मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुईज्जू यांची माहिती
 
माले, 
मालदीवमध्ये असलेल्या भारतीय जवानांचा पहिला गट 10 मार्चपूर्वी परत पाठवला जाईल. त्यानंतर उर्वरित भारतीय आणि दोन उड्डाण मंच 10 मेपर्यंत परत पाठवले जातील, असे President of Maldives Mohamed Muijju मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईज्जू यांनी सोमवारी सांगितले. आपल्या भूमीवरील विदेशी सैन्य परत पाठविण्याबाबत मालदीवच्या बहुतांश नागरिकांचा पाठिंबा आहे तसेच गमावलेला महासागरी प्रदेश परत मिळवला जाईल, असा विश्वास असल्याचे मुईज्जू यांनी संसदेतील पहिल्या भाषणात सांगितले.
 
 
Mohamed Muijju
 
देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करावा लागणारा कोणत्याही देशाच्या कराराला आपले प्रशासन मान्यता देणार नाही, असे मुईज्जू यांनी सांगितल्याचे वृत्त ‘द एडिशन’ या वृत्तपत्राने दिले आहे. President of Maldives Mohamed Muijju मुईज्जू यांनी 17 नोव्हेेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर मालदीवमधील 88 जवान 15 मार्चपर्यंत मागे घेण्यात यावे, अशी विनंती भारताला केली होती. या आशयाची विनंती करण्यासाठी मालदीवमधील नागरिकांनी आपल्याला मोठा जनादेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले होते.
 
 
राष्ट्राध्यक्ष इतर देशांशी करू शकतात, ती राजनयिक चर्चा सुरू आहे. मालदीवमध्ये असलेल्या भारतीय पथकांना हटजलण्याबाबतची अधिकृत विनंती केली आहे. या मुद्यावर विचार-विनिमय केला जात आहे, असे मुईज्जू म्हणाले. अलिकडे झालेल्या चर्चेनुसार, तीन उड्डाण मंचांपैकी एकावरील लष्करी जवान 10 मार्चपूर्वी देश सोडतील. उर्वरित दोन उड्डाण मंचांवरील सैनिक 10 मेपर्यंत परत पाठवले जातील, असे मुईज्जू यांनी संसदेत सांगितले.