ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांना कर्करोगाचे निदान

    दिनांक :06-Feb-2024
Total Views |
लंडन, 
ब्रिटनचे King Charles किंग चार्ल्स तिसरे यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर सोमवारपासून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती बकिंगहॅम पॅलेसने दिली. बकिंगहॅम पॅलेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 75 वर्षीय किंग चार्ल्स यांना वाढलेल्या प्रोस्टेटच्या उपचारादरम्यान कर्करोग झाल्याचे निदान झाले. किंग चार्ल्स यांना कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे आणि शरीराच्या कोणत्या भागात आहे, याचा उल्लेख निवेदनात करण्यात आलेला नाही. चार्ल्स यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
 
 
King Charles
 
राजघराण्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, King Charles किंग चार्ल्स पूर्णपणे सकारात्मक आहेत आणि लवकरच त्यांची शाही कर्तव्ये पुन्हा सुरू करतील. मात्र, आजारातून बरे होण्यासाठी किती वेळ लागेल, याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. आजारपणामुळे ते काही काळ राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या जागी कुटुंबातील इतर ज्येष्ठ सदस्य सामील होतील. या काळात ते कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे आणि राजवाड्यात छोट्या खाजगी बैठका घेणे सुरू ठेवतील. 2022 मध्ये दुसर्‍या राणी एलिझाबेथच्या मृत्यूनंतर चार्ल्स तिसरे ब्रिटनचे राजे झाले आहेत.
 
 
लवकर बरे व्हा : पंतप्रधान मोदी
King Charles किंग चार्ल्स यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना एक्सवर पोस्ट करीत शुभेच्छा दिल्या. किंग चार्ल्स यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी कामना मी भारतीय नागरिकांसोबत करतो, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.