मुख्याध्यापकांनो! मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम प्राधान्याने राबवा

    दिनांक :06-Feb-2024
Total Views |
- पोपेश्वर भोयर यांनी आढावा सभेत दिल्या सूचना

यवतमाळ, 
राज्यात Mukhyamantri majhi shala sundar shala मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे राज्यव्यापी अभियान 1 जानेवारीपासून कार्यान्वीत करण्यात आली असून मुख्याध्यापकांनी या उपक्रमाची नोंदणी करुन हा उपक्रम प्राधान्याने राबवावा, असे निर्देश यवतमाळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर यांनी दिले. या उपक्रमाचे प्रत्येक शाळांनी आभासी नोंदणी करुन आपल्या शाळेत 30 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयाप्रमाणे शाळेत विविध उपक्रम राबवून या स्पर्धात्मक अभियानात यवतमाळ तालुक्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सहभागी होवून शाळा सर्वांग सुंदर बनवाव्या असे आवाहन केले.
 
 
School
 
Mukhyamantri majhi shala sundar shala : यावेळी दिलेल्या सर्वेक्षणाचे विहित कालावधीतपूर्ण करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. शाळेतील सर्व शिक्षकांच्या समन्वयातुन रंगरंगोटीसह शाळा सर्वांग सुंदर बनवा व शाळांची 100 टक्के नोंदणी करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांच्या सहायाने तालुक्यातील पूर्ण शाळा या अभियानात सहभागी झाल्या पाहिजे असेही त्यांनी निर्देश दिले. ते यवतमाळ जिल्हा परिषद सभागृह येथे 3 फेब्रुवारी रोजी आयोजित केंद्रप्रमुखांसह तालुक्यातील मुख्याध्यापक सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी विस्तार अधिकारी विद्या वैद्य, नलिनी वंजानी, केंद्र प्रमुख सुदर्शन थोटे, जिल्हा समन्वयक शुभांगी वानखेडे, सचिन सानप, श्याम माळवी, प्रकाश येरमे, राधेश्याम चेले, सारंग भटुरकर, मेश्राम, मेनकुदळे, वैशाली गायकवाड, प्रीती ओरके, वर्षा भुतनेर यांच्यासह तालुक्यातील नगर परिषद व जिपचे केंद्र प्रमुख व तालुक्यातील मोठ्या संख्येत मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.