मालेगाव,
Nath Nange Maharaj Yatra : श्री नाथ नंगे महाराज संस्थान विश्वमंदीर, श्रीक्षेत्र डव्हा येथे १० ते १६ फेब्रुवारी दरम्यान यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमीत्त सात दिवस किर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा महोत्सवा दरम्यान दैनदिन कार्यक्रमामध्ये वे. शा. शशीकांत देव शास्त्री यांचे आचार्यत्वाखाली गायत्री जप, श्री विश्वनाथ महाराज अभिषेक व हवन, नारायण महाराज यांच्या वाणीतून भागवत वाचन, सिताराम महाराज यांचे मार्गदर्शनाखाली हरिनाम सप्ताह, दुपारी ३ ते ५ वाजात दरम्यान, श्री विश्वजीत ग्रंथ वाचन गोवर्धन महाराज राऊत यांच्या वाणीतून होणार आहे.
सकाळी ५ ते ६ काकडा, श्रीमद् भागवत कथा सकाळी १० ते १२ वाजता, सायंकाळी ८ ते १० हरिकीर्तन, रामभाऊ महाराज यांचे सहकार्याने होईल. दैनदिन किर्तन कार्यक्रमामध्ये १० फेब्रुवारी रोजी मदन महाराज काठोडे, ११ रोजी विठ्ठल महाराज वक्ते, १२ रोजी गंगाधर महाराज मुंदे, १३ रोजी मधुकर महाराज देगांवकर, १४ रोजी सुरेश महाराज बाफडे, १५ रोजी गोपाल महाराज सरकटे, १६ फेब्रुवारी रोजी सिताराम महाराज खानझोडे यांचे काल्याचे किर्तनानंतर Nath Nange Maharaj Yatra श्री नाथ नंगे महाराज पालखी सोहळा व भव्य महाप्रसादाचे वाटप दुपारी ३ वाजता पासून होणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी नारायण महाराज खडकीकर यांचे किर्तन चाकातिर्थ येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांचे वतीने करण्यात आले आहे.