तब्बल 35 वर्षानंतर जुन्या वर्ग मित्रांचे स्नेहमिलन

    दिनांक :06-Feb-2024
Total Views |
ढाणकी,
येथील गुलाबसिंह ठाकूर शाळेमध्ये तब्बल 35 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा Snehmilan Sohala स्नेहमिलन सोहळा पार पडला. या स्नेहमिलन सोहळ्यामध्ये 1987-80 बॅचचे विद्यार्थी उपस्थित होते. ढाणकी सोडून बाहेरगावी इतरत्र मोठमोठ्या व्यवसायावर, नोकरीवर गेलेल्या विद्यार्थ्यांनी व्हाट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र भेटायचे ठरवले. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदचे विद्यार्थी तब्बल 35 वर्षानंतर ढाणकी येथे आपल्या जुन्या शाळेत एकत्रित जमले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला केवळ वर्गमित्रच नाही तर, त्यांना शिकवणार्‍या शिक्षकांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
 
 
Snehmilan
 
या Snehmilan Sohala  स्नेह मिलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक फुलेवार व गोरखनाथ आर्कीलवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदापुरे होते. प्रमुख अतिथी म्हणून वडे, खंदारे, हळदे, जांभुळकर, राठोड, देशमुख, लिगदे व उगले उपस्थित होते. राजेश येरावार, शेख मुसा, संजय पराते, राजेश रामधनी, उत्तम रावते, संजय कांबळे, अरविंद राठोड, विठ्ठल कोरटवार, अवधूत चंद्रे, विवेक येरावार यांनी शिक्षकांचे स्वागत केले. स्नेहमिलन सोहळ्याची सुरुवात साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे या सुंदर कवितेने करण्यात आली. या कार्यक्रमात संजय कुंभरवार, पुरुषोत्तम पवार, अभिजित कोडगिरवार या वर्ग मित्रांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विजय देवधर यांनी केले. हा स्नेहमिलन सोहळा घडवून आणण्यामध्ये सर्वात मोठा वाटा तुळशीराम गायकवाड, विनोद फुलकोंडवार, अविनाश पांडे, रमेश उपेवाड व अविनाश सोनटक्के यांचा आहे. त्यांच्या परिश्रमाने तब्बल 35 वर्षानंतर सर्व 80 बालमित्र आपल्या शिक्षकांसह ढाणकी येथे भेटले.