गोंदिया,
Gondia Collector Prajit Nair : जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून प्रजीत नायर यांनी मावळते जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. त्यांचे विविध विभागाच्या अधिकार्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चिन्मय गोतमारे यांची वैधानिक विकास महामंडळाच्या सचिव पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर सिंधुदुर्ग येथून प्रजीत नायर हे जिल्हाधिकारी म्हणून आले.
प्रजीत नायर Gondia Collector Prajit Nair हे यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते 2017 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे शिक्षण अभियांत्रिकी पदवी व एम.ए. पर्यंत झाले आहे. त्यांची मातृभाषा मल्याळम असून ते उत्तम मराठी बोलतात. परीविक्षाधीन अधिकारी जिल्हा प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्हा, परीविक्षाधीन अधिकारी जिल्हा प्रशिक्षण अहमदनगर, प्रभाग अधिकारी महानगरपालिका अहमदनगर, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी निवडणुक निर्णय अधिकारी अहमदनगर, सहाय्यक सचिव औषध निर्माण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जिल्हा पालघर आदी ठिकाणी त्यांनी कार्य केले आहे.
26 फेब्रुवारी 2021 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ते मुख्य कार्यकारी अधिकारी, Gondia Collector Prajit Nair जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या पदावर कार्यरत होते. आता त्यांनी जिल्हाधिकारी गोंदिया या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यावेळी अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, सहायक जिल्हाधिकारी तथा देवरी उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) चंद्रभान खंडाईत, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भैय्यासाहेब बेहरे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे व जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.