कापसाच्या दरात ‘घसरण’

    दिनांक :06-Feb-2024
Total Views |
- प्रतिक्विंटल दर 6600 : शेतकर्‍यांचा कापूस अजूनही घरातच

यवतमाळ, 
हंगामाच्या सुरवातीला कापसाचे दर 7 हजार 200 रुपयांपर्यंत पोेचले होते. गेल्या काही दिवसांत cotton prices कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कापसाचे दर सद्यस्थितीत 6 हजार 600 ते 7 हजार 650 रुपयांवर आले आहेत. दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली असून, कापसाला भाव मिळेल या अपेक्षेने अजून शेतकर्‍यांच्या घरात कापूस आहे. सततच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. कापसाचे दर 7 हजार 200 रुपयांपुढे सरकले नसल्याने शेतकर्‍यांचा भ्रमनिरास झाला आहे. हंगामाच्या सुरवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली तेजी पाहता कापसाचे दर वाढण्याची शक्यता शेतकर्‍यांना होती.
 
 
Kapoos
 
cotton prices कापसाचे दर वाढतील, असा तज्ञांचा अंदाज होता. त्यामुळेच शेतकर्‍यांनी कापसाची विक्री थांबविली होती. दर वाढण्याऐवजी घसरल्याने ऐन हंगामात बाजारात विक्रीला येणार्‍या कापसाची आवक मंदावली होती. या संपूर्ण हंगामात कापसाचे दर 7200 रुपयांच्या वर तर गेले नाहीतच पण काही दिवसांत वाढलेले दरही खाली आले आहेत. काही महिन्यांपासून कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. दर कोसळल्याने शेतकर्‍यांनी कापूस विकण्याऐवजी घरात साठवणूक केला आहे. आता पुन्हा दरात घसरण झाली आहे. दरात घसरण झाल्याने शेतकर्‍यांनी कापूस केंद्राकडे पाठ फिरवली आहे. हंगामाच्या सुरवातीपासून आतापर्यंत कापसाच्या दरात 1 हजार रुपयांची घट झाली आहे. हमीभावाच्या तुलनेत दर खाली आल्यानंतरही शासनाकडून अजूनही शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेली नाहीत.
शेतमालाचे सध्याचे बाजारभाव
सोयाबीन - 4150 - 4500
तूर (नवीन) - 9300 - 10200
चणा (नवीन) - 4900 - 5251
गहू (नवीन) - 2200 - 2480
कापूस - 6600 - 6650
सीसीआयचे सात केंद्र कार्यरत असल्याचा दावा
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, घाटंजी, राळेगाव, वणी, खैरी, सिंदोला आणि पांढरकवडा या सात कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत cotton prices कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरू असल्याचा दावा संबंधितांनी केला आहे. या व्यतिरिक्त सीसीआयच्या दिग्रस, महागाव व यवतमाळ या तीन केंद्रांवर किमान हमी दराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. एफएक्यू दर्जाच्या कापसाचा सरकारी भाव 6620 आणि 7020 असा आहे. परंतु त्यांना अपेक्षित असलेल्या दर्जाचा कापूस शेतकर्‍यांजवळच उपलब्ध नसल्यामुळे सीसीआय हा कापूस खरेदी करूच शकत नसल्याची माहिती आहे.