मुंबई,
Vedaa Release Date नायकाला मारण्याचा प्रयत्न करणारा जॉन अब्राहम आता संरक्षक बनून नायिकेला वाचवताना दिसणार आहे. जॉन शेवटचा शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात एक्स-एजंट म्हणून दिसला होता. आता तो निखिल अडवाणीच्या आगामी चित्रपटात दमदार ॲक्शन करताना दिसणार आहे.
जॉन अब्राहमने बुधवारी सकाळी एक पोस्ट टाकून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. त्याच्या आगामी 'वेदा' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. जॉन अब्राहम अभिनेत्री शर्वरी वाघसोबत चित्रपट करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. तेव्हापासून जॉन आणि शर्वरीच्या चित्रपटाची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. Vedaa Release Date आता अखेर प्रतिक्षेची वेळ संपली.
जॉन अब्राहमच्या 'वेदा' या नव्या चित्रपटाची शानदार पोस्टर जाहीर करण्यात आली आहे. चित्रपट निर्माते निखिल अडवाणीने सोशल मीडियावर 'वेदा'चे अप्रतिम पोस्टर शेअर केले आहे. जॉन आणि शर्वरीचा दमदार फर्स्ट लूक या पोस्टरच्या माध्यमातून समोर आला आहे. यामध्ये दोघांचे अर्धे चेहरे दिसत आहेत. जॉनच्या डोळ्यात तीव्र राग आहे, तर शर्वरीच्या डोळ्यात रागासोबत अश्रू आहेत. ती अभिनेत्याच्या मागे उभी आहे. जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांच्याशिवाय 'स्त्री' अभिनेता अभिषेक बॅनर्जी आणि तमन्ना भाटिया हे कलाकारही 'वेदा' मध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले आहे, तर कथा असीम अरोरा यांनी लिहिली आहे. जॉन अब्राहमने अभिनयासोबतच चित्रपटाची निर्मितीही केली आहे.