बारामतीचे महाभारत ; शरद पवारही झाले रिकामे !

ajit-sharad-pawar-ncp फोडाफोडीचे राजकारण

    दिनांक :08-Feb-2024
Total Views |
प्रासंगिक 
 
- मोरेश्वर बडगे 
ajit-sharad-pawar-ncp नियती मोठी क्रूर असते. उधारी ठेवत नाही. याच जन्मात हिशोब चुकता करावा लागतो. गेली ५० वर्षे महाराष्ट्राचे राजकारण स्वतःभोवती खेळवत ठेवणाऱ्या शरद पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला दणका ही नियतीचीच वसुली आहे. ajit-sharad-pawar-ncp बारामतीची भानामती करून ठेवली होती या तथाकथित अजाणत्या राजाने. आता खेळ खल्लास! पुतण्याने वारंवार सांगूनही रिटायर व्हायला तयार नसलेल्या या ८३ वर्षे वयाच्या काकाची सक्तीची रिटायरमेंट आता सुरू झाली आहे. ajit-sharad-pawar-ncp तीन महिन्यांनंतर होणाऱ्या लोकसभा आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार कुठेही नसतील इतका जबरदस्त चक्रव्यूह त्यांची वाट पाहतो आहे. ‘बिनचिपळ्यांच्या या नारदाची' सुटी पक्की आहे. इतरांची ‘घरं' फोडणाऱ्या प्रचंड संधिसाधू शरद पवारांच्या हाती आता काही उरले नाही. ajit-sharad-pawar-ncp उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे तेही रिकामे झाले आहेत.
 
 
 
ajit-sharad-pawar-ncp
 
 
सहा महिन्यांपूर्वी अजित पवार ४० आमदारांसह बाहेर पडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अजितदादा भाजपा व शिवसेना सरकारमध्ये सामील झाले तेव्हापासून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. काका-पुतण्या दोघांनीही आमचाच गट खरा राष्ट्रवादी आहे, असा दावा केला होता. ajit-sharad-pawar-ncp त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह ‘घड्याळ' हे निवडणूक चिन्हही आयोगाने अजितदादा गटाकडे दिले आहे. आपल्यालाच राजकारण कळते, अशा गुर्मीत राहणाऱ्या शरद पवारांना हा मोठा झटका आहे. याआधी असाच झटका उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने दिला होता. आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना घोषित केले होते. ajit-sharad-pawar-ncp तो निकाल आला तेव्हा माझ्या वडिलांचा पक्ष चोरला, अशी ओरड उद्धव ठाकरे यांनी केली होती. शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे याही सध्या तीच टेप वाजवत आहेत. लोकांची सहानुभूती मिळेल, असे त्यांना वाटते, पण काही उपयोग नाही. पक्ष चोरला म्हणायला यांचा पक्ष होताच कुठे? शरद पवारांनी पळवापळवी, फोडाफोडीचेच राजकारण केले.
 
 
वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून ते सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले; ज्यावर पवार कुटुंब हक्क सांगत होते, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारांनी २५ वर्षांपूर्वी काढला. त्यासाठी काँग्रेसमधलेच आमदार फोडले होते. सोनिया गांधी या विदेशी आहेत, असे सांगून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची चूल मांडली होती. मात्र, पुढे पलटी मारली. ajit-sharad-pawar-ncp त्याच सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या मंत्रिमंडळात तब्बल १० वर्षे त्यांनी कृषिमंत्री पद भोगले. सत्तेच्या सावलीतच पवार खेळत आले. ‘जिधर बम, उधर हम...' शरद पवारांनी कधीही नीतिमत्तेचे राजकारण केले नाही. तरीही स्वतःभोवती कायम संभ्रमाचे जाळे विणत ठेवत त्यांनी महाराष्ट्राला झुलवत ठेवले. मात्र कन्यामोहाने त्यांचा घात केला. कन्येला उत्तराधिकारी करण्याचा शरद पवारांनी बांधलेला चंग दबंग अजितदादांनी ताकदीने उधळून लावला. ajit-sharad-pawar-ncp अजितदादांच्या बंडाची कारणे आता लपून राहिली नाहीत. पाच वेळा उपमुख्यमंत्रिपद दिले. पुढे मात्र हुलकावणी. संधी असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेले मुख्यमंत्रिपद काकाने काँग्रेसला दिले. सुप्रिया सुळे यांना पक्षात मिळत असलेले महत्त्व हे दादांचे मुख्य दुखणे होते. 
 
 
अजितदादांना वारंवार पुढे करून नंतर तोंडघशी पाडले गेले. शरद पवारांच्या सांगण्यावरूनच अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला होता. मात्र, लगेच पवारांनी पुतण्याला राजीनामा द्यायला भाग पाडले. शरद पवारांनी अजितदादांचा पुत्र पार्थ याला पुढे आणले असते तर साऱ्या गोष्टी अजितदादा विसरले असते. ajit-sharad-pawar-ncp पण काकाच्या मनात काही वेगळेच होते. काकाला आपला दुसरा नातू रोहित पवार याला कर्जत-जामखेडमधून पुढे आणायचे होते. मावळ मतदारसंघातून पार्थने उभे राहू नये, असे काकाचे मत होते. तरीही पार्थ उभा राहिला आणि लाख मतांनी पडला. शरद पवारांचा नातू पडू शकतो, हा साऱ्यांसाठी धक्काच होता. पवार कुटुंबातला कलह खऱ्या अर्थाने इथून वाढला. काकाने आपल्याला संधी मिळूनही मुख्यमंत्री होऊ दिले नाही. आता पार्थच्या मार्गातही आडवे येत आहेत, हे पाहून अजितदादा अस्वस्थ होते.
 
 
ajit-sharad-pawar-ncp काकाचे वय झाले. त्यांनी थांबायला हवं, अशी जाहीर भूमिका अजितदादांनी घेतली तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसची दुफळी स्पष्ट झाली होती. पार्थला ब्रेक मारू पाहण्याची किंमत आता शरद पवार मोजत आहेत. दादा संधीची वाट पाहत होते. गेल्या जुलैमध्ये त्यांनी घाव घातला. उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्ष गेला तेव्हा सुप्रिया सुळे यांची आदळआपट लक्षात येण्यासारखी होती. वडिलांचा पक्ष भाऊ घेऊन जाईल, ही त्यांची तेव्हाची भीती खरी ठरली. पक्ष गेला तरी माझा बाप माझ्याकडेच आहे, असे आता त्या म्हणाल्या. त्यांची एक कार्यकर्ती म्हणाली, ‘टायगर अभी जिंदा है.' पण राजकारणात असले फिल्मी डायलॉग चालत नसतात. हा सिनेमा नाही. ajit-sharad-pawar-ncp त्यामुळे पवारांनी आता पावसातल्या कितीही सभा केल्या तरी आता ते कोरडेच राहतील, हेही तेवढेच खरे आहे.