हे सार्वजनिक नव्हे, वैयक्तिक नुकसान !

civic sense-awareness आसुरी आनंदाचे समाधान

    दिनांक :08-Feb-2024
Total Views |
वेध
 
 
- संजय रामगिरवार
 
civic sense-awareness आज लहानशी मात्र लक्ष वेधून घेणारी बातमी वर्तमानपत्रात आली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या रेल्वे स्थानकातील टॉयलेट, बाथरूममधून तब्बल १२ लक्ष रुपयांच्या नळाच्या तोट्या चोरट्यांनी लंपास केल्या. लांब पल्ल्याच्या गाड्या जेथे थांबतात त्या स्थानकाजवळील वातानुकूलित टॉयलेट व बाथरूममधून ही चोरी झाली असल्याने रेल्वे प्रशासन चिंतेत आहे. civic sense-awareness व्यवस्थापनाशी संबंधितच कुणीतरी या विचित्र चोरीच्या घटनेमागे असावा, असा अंदाज व्यक्त केला जात असल्याची ही बातमी आहे. खरे तर, भारत देश आपल्या आर्थिक समृद्धीसाठी एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभा आहे. २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तोपर्यंत भारताला विकसित देशाच्या मांदियाळीत उभे करायचे आहे. civic sense-awareness किंबहुना, तसा संकल्पच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भारताची जीडीपी सध्या ३.७ ट्रिलियन डॉलर्सची असून ती ५ ट्रिलियनकडे नेण्याचा प्रयत्न सुरू असताना, एका सार्वजनिक व्यवस्थेच्या ठिकाणाहून चक्क नळाच्या तोट्या चोरून नेल्या जात असेल, त्याही थोड्याथोडक्या नव्हे तर लाखो रुपयांच्या तर ही बाब लांच्छनास्पदच म्हणावी लागेल.
 
 
civic sense-awareness
 
civic sense-awareness सार्वजनिक मालमत्ता लुटणे किंवा तिची तोडफोड करणे ही गोष्ट सार्वजनिक नुकसानीची नाहीच; तर ती या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या वैयक्तिक हानीची आहे. कारण, त्यांनीच दिलेल्या कराच्या पैशातून अशी सार्वजनिक संपत्ती उभी राहत असते. हे कुणाला माहीत नाही किंवा कळत नाही, असेही नाही. पण तरीही अशा घटना वारंवार होतात आणि त्या संतप्त करीत असतात. सदर चोरी ही १२ लाखांची तरी आहे. civic sense-awareness पण सार्वजनिक रस्त्यावर लावलेले गट्टू चोरून नेणे, काहीच कारण नसताना पथदिव्यांच्या काचा दगड मारून तोडून टाकणे, विजेच्या व्यवस्थेतील तांब्याची तार तोडून लंपास करणे, एवढेच नव्हे तर रस्त्याच्या कडेला लावलेले रोपटे आणि त्याच्या संरक्षणासाठी लावलेले ‘ट्री गार्ड' चोरीला जाण्याची उदाहरणे आपण सर्वांनी नक्कीच बघितली असेल. यातून चोरट्याचा खूप लाभ होतो अशातलाही भाग नाही. पण त्यामागचा आसुरी आनंद त्यांना कमालीचे समाधान देतो, असे वाटते. civic sense-awareness ही मानसिकता, नव्हे विकृती या देशाला परमवैभवापर्यंत खरेच घेऊन जाऊ शकते का, यावर सार्वजनिकरीत्या गंभीर चिंतन झाले पाहिजे. 
 
 
बँकेत दोरी बांधलेला पेन किंवा मग एखाद्या प्याऊवर दोरीने घट्ट बांधलेला ग्लास अजूनही दिसतो, तेव्हा वाईट वाटते. ही वृत्ती शिक्षण आणि संस्काराअभावी असेल तर कुटुंब संस्काराची गरज प्रकर्षाने अधोरेखित होते. कारण सार्वजनिक व्यवस्थेत अशा घटनांवर आळा बसवण्यासाठी कायदे आहेच; पण ते पाळले जात नाही, ही शोकांतिका आहे. civic sense-awareness ‘सार्वजनिक संपत्ती नुकसान निवारण अधिनियम १९८४ङ्क अंतर्गत एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे सिद्ध झाल्यास त्याला पाच वर्षांपर्यंतची शिक्षा आहे. सोबतच दंडही आहे. शिवाय त्या व्यक्तीला जामीन तेव्हाच मिळतो जेव्हा ती व्यक्ती पूर्ण नुकसान भरपाई करते. सोबतच भारतीय दंड संहितेचे अन्य कायदे आहेच. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याच्या संपत्तीचे नुकसान केले तर आयपीसीच्या कलम ४२५ नुसार तो दोषी ठरतो. civic sense-awareness नुकसान करण्यामागे त्याची भावना काय होती, हेही पाहिले जात नाही, तर तो जे कृत्य करीत आहे त्यातून संपत्तीचे नुकसान होणार आहे की नाही, एवढे त्याला माहीत असणे पुरेसे ठरते.
 
 
 
मागे सरकारने ‘अग्निपथ' योजना आणली होती तेव्हा काही विद्यापीठातील विद्याथ्र्यांनी प्रचंड उपद्रव केला. बिहार व उत्तर प्रदेशात रेल्वे गाड्यांना आगी लावल्या गेल्या. याआधीही देशात विविध कारणांनी हिंसात्मक विरोध झाला आणि प्रत्येक वेळी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले गेले. कारण अशा हिंसक लोकांचे ‘सॉफ्ट टार्गेट' सरकारी संपत्ती हेच असते. अत्यावश्यक सेवेच्या सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानीसाठी तर आणखी कडक कायदा आहे. civic sense-awareness पाणी पुरवठा, वीज पुरवठा, सार्वजनिक दळणवळण आदी व्यवस्थेचे नुकसान केल्यास सार्वजनिक नुकसान निवारण अधिनियम १९८४ च्या सेक्शन २, ३ व ४ अंतर्गत कमीत कमी ६ महिन्यांपासून तर १० वर्षांपर्यंतही शिक्षा ठोठावली जाऊ शकते. पण तरीही देशात सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्याची मानसिकता काही कमी होत नाही, हे देशाच्या भविष्याचा वेध घेताना निश्चितच qचताजनक आहे, असे वाटते.
९८८१७१७८३२