ई-क्लास जमिनीवरील मायरूखाच्या वृक्षाची अवैध कत्तल

08 Feb 2024 16:49:15
आकोट,
illegal felling of trees : आकोट ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द शिवारातील ग्रामपंचायतच्या ताब्यातील ई-क्लास जागेतील महाकाय मायरूखवच्या झाडाची कत्तल अज्ञात वनतस्कराने केली. याबाबतची तक्रार अडगाव खुर्दच्या सरपंच सुनीता पद्माकर सोनोने यांनी आकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला 23 जानेवारी रोजी केली होती. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी सरपंचांनी पोलिसांना केली आहे.
 
 
trees
 
 
शेत सर्वे नंबर 1/ 29 अडगाव खुर्द मलकापूर येथील ई-क्लास जागेत शेततलाव आहे. ही जागा ग्रामपंचायतच्या मालकीची असून या जागेवर मोठे मोठे वृक्ष आहेत.ही जागा पडीक आहे .या जागेवर पवरा नदीच्या काठावर गुरे चारणार्‍या इसमांनी अडगाव खुर्दचे सरपंच व सदस्यांना अज्ञात वनतस्कराने मायरूखाचे झाड तोडल्याचे सांगितल्यावर सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळ गाठले व या बाबत चौकशी केली.
 
तेव्हा घटनास्थळी तिथे ते झाड कापलेले दिसले. मात्र हे झाड कोणी कापले, झाडाचे काही अवशेष तिथे पडून सुद्धा आहेत याबाबत सरपंचांनी थेट आकोट ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
 
एकीकडे केंद्र व राज्य शासन शतकोटी वृक्ष लागवड योजना हाती घेते त्यामध्ये करोडो रुपयांचा निधी खर्ची घातला गेला त्यातून परिणाम मात्र शून्य निघाला.जिवंत झाडे तोडली गेली आणि वनविभागाला याचा पत्ता लागत नाही अशी नागरिकांचीही तक्रार आहे.
वृक्ष लागवड व संवर्धन तर सोडाच अस्तित्वात असलेल्या वृक्षांना चोरट्या मार्गाने कापून मोठ्या प्रमाणात अवैद्य लाकूड तस्करी सुरू आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वनविभागाची डोळे झाक होत आहे. हा प्रकार थांबला पाहिजे अशी वन्य प्रेमींची मागणी आहे.
Powered By Sangraha 9.0