वैयक्तिक वैमनस्यातून घटना घडली : फडणवीस

    दिनांक :09-Feb-2024
Total Views |
मुंबई, 
गोळीबाराची घटना ही वैयक्तिक वैमनस्यातून घडली आहे. परंतु, या घटनेला विरोधक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहेत. घडलेली घटना ही गंभीर असली, तरी त्याला राजकीय रंग देणे योग्य नसल्याचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एका तरुण नेत्याचा अशा पद्धतीने मृत्यू व्हावा, हे अतिशय गंभीर आहे. काही लोक या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे योग्य नाही. ही घटना गंभीर आहे. मात्र, गोळ्या घातल्या त्या मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे एकत्रित फोटो पाहायला मिळाले. वर्षानुवर्षे ते एकत्र काम करीत होते.
 
 
Devendra Fadnavis
 
आता कुठल्या विषयावरून बेबनाव झाला, हे महत्त्वाचे आहे, चौकशी सुरू आहे. पोलिस तपासात वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. योग्यवेळी ती माहिती तुम्हाला दिली जाईल, असे फडणवीस म्हणाले. गोळीबाराची घटना गंभीर आहे. मात्र, त्याचे राजकारण करणे योग्य नाही. या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्था संपलेली आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण ही हत्या व्यक्तिगत वैमनस्यातून घडली आहे,. ज्यांच्याकडे बंदुकांचे परवाने आहे, त्यांची पडताळणी करणे आणि नवीन परवाना देताना काय खबरदारी घेतली पाहिजे, याचा विचार सरकार नक्कीच करेल, असेही Devendra Fadnavis फडणवीस म्हणाले.