सार्वत्रिक निवडणुकीवर 42 अब्ज रुपये खर्च

    दिनांक :09-Feb-2024
Total Views |
- पाकिस्तानवरील आर्थिक संकट झाले आणखी गडद

कराची, 
Pakistan economic crisis : पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीवर 42 अब्ज रुपये खर्च झाला आहे; जो गत निवडणुकीपेक्षा 26 टक्के अधिक आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच वाईट अवस्थेत आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीवर प्रचंड रक्कम खर्च करण्याची आकडेवारी समोर आली आहे. पाकिस्तानने सामान्य नागरिकांवर वीज व इतर प्रकारचे कर लावून सार्वत्रिक निवडणुका पार पाडल्या, ज्याचा थेट परिणाम लोकांवर होतो. या निवडणुकीत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) कर्ज मिळाले असले, तरी निवडणुकीत मोठ्या खर्चामुळे पाकिस्तानवरील आर्थिक दबाव वाढेल व येणार्‍या आर्धिक संकटातून पाकिस्तानला बाहेर पडणे सोपे होणार नाही, असे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.
 
 
PAKISTAN-VOTING
 
Pakistan economic crisis : पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सार्वत्रिक निवडणूक इतिहासातील सर्वांत महाग निवडणूक ठरणार आहे. या सार्वत्रिक निवडणुकीत 42 अब्ज रुपये खर्च करण्यात आला. हा खर्च गत 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत 26 टक्के जास्त आहे. जर सुरक्षा आणि इतर व्यवस्थेवरील खर्च यात जोडला, तर निवडणुकीवरील एकूण खर्च 49 अब्ज रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असे मत एआरआय या पाकिस्तानची वृत्त वाहिनीने व्यक्त केले आहे.
सर्वात महागडी निवडणूक
Pakistan economic crisis : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक 8 फेब्रुवारीपासून सुरू झाली आणि शुक्रवारी त्याचा निकाल येत आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारंभिक अर्थसंकल्पात 42 अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यामुळे हा खर्च 2018 च्या निवडणुकीपेक्षा 26 टक्के अधिक महाग आहे. एकंदरीत पाकिस्तानच्या इतिहासातील ही सर्वांत महाग निवडणूक ठरली आहे. निवडणूक अर्थसंकल्पातील सर्वाधिक खर्च मतपत्रिका कागदपत्रांच्या छपाईवर, सुरक्षेसाठी एजन्सी तैनात आणि मतदान कर्मचार्‍यांच्या देयकावर खर्च करण्यात आला आहे.