शंखपुष्पी- प्रमाणित ब्रेन टॉनिक

    दिनांक :09-Feb-2024
Total Views |
नागपूर, 
Shankhpushpi – Brain tonic : शाळेत शिकणार्‍या प्रत्येक मुलाची व त्याच्या आई-वडिलांची ही इच्छा असते की, त्यांचा मुलगा/मुलगी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण व्हावा. त्यामुळे परीक्षेची तयारी म्हणजे एक मिशनच बनून जाते. प्रत्येकच जण हे मिशन उत्कृष्ट रीतीने पार पाडू इच्छितो. परंतु, भीतीपोटी काही संवेदनशील मुले या मानसिक तणावामुळे नैराश्यग्रस्त होतात, मुलांवर हा मानसिक तणाव तीन स्तरांवर दिसून येतो. शाळेच्या प्री बोर्ड व बोर्डाची वार्षिक परीक्षा. विद्यार्थ्यांना याबाबत वाटणारे भय, हा आज एक चिंतेचा विषय बनला आहे. कधी कधी पेपर फुटल्यामुळे अभ्यास करणार्‍या मुलांवर टेन्शन अधिकच वाढताना दिसून येते.
 
 
SPS-1
 
Shankhpushpi – Brain tonic : वेगवेगळ्या व्यवसायाशी संबंधित स्पर्धात्मक परीक्षा देताना करीअर विकासाच्या तणावामुळे मुले आत्मघाती बनत आहेत. आजच्या या आंधळ्या स्पर्धेच्या काळात आई-वडिलांच्या मुलांकडून अभ्यासासंबंधीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आई-वडील मुलांच्या क्षमतेचा विचार न करता अपेक्षा करतात की, मुलगा मेरीटमध्येच यावा किंवा त्याने 90 टक्के गुण मिळवावे, जेणेकरून त्यांचा समाजात रूबाब वाढेल, त्यांच्या स्टेट्सचे हे एक चिन्ह बनलेले आहे. वर वर्णित स्थितीमुळे मुलांकरिता परीक्षा म्हणजे एक भीतीदायक बाब बनून जाते. त्यांची जेवणाची इच्छा मरून जाते. चिडचिडेपणा वाढतो, सतत डोकं दुखत राहत, कधी कधी तर नैराश्यामुळे तर तो विचित्र वागू लागतो.
 
 
 
आई-वडिलांनी, मुलाच्या (विद्यार्थ्यांच्या) मानसिक स्थितीवर संपूर्ण लक्ष द्यायला पाहिजे. त्यांच्यावर अभ्यासाचा आवश्यकतेपेक्षा जास्त भार देऊ नये किंवा त्यांची क्षमता पाहून त्यांना अभ्यास करावयास लावावं व त्यासोबत त्याला योगासन करावयास लावावे व यासोबत हानीरहित आयुर्वेदिक जडीबुटी (ब्राम्ही व शंखपुष्पी) वापराव्यात. Shankhpushpi – Brain tonic याच ब्राम्ही व शंखपुष्पीच्या मिश्रणाने बनलेला योग ‘बैद्यनाथ शंखपुष्पी सिरप’ मुलांना द्यायला हवे. ब्राम्ही व शंखपुष्पीला सेंट्रल ड्रग रिसर्च इंस्टिट्यूटने एकाग्रता वाढविण्यास सहायक जडीबुटींच्या रूपात मान्यता दिली आहे. ब्राम्ही व शंखपुष्पीचे सिरप मुलांना दिल्यास त्यांना परीक्षेच्या वेळी होणारी डोकेदुखी, चिडचिडेपणा दूर होऊन मुले शांत मनस्थितीने कार्य करण्यात रूची दाखवितात.