दीदींना आता ''राम'' आठवला...रामनवमीला सुट्टी केली जाहीर !

    दिनांक :10-Mar-2024
Total Views |
कोलकाता, 
Ramnavami holiday पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने 17 एप्रिलला राम नवमीला सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात पहिल्यांदाच रामनवमीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अत्यावश्यक सेवा वगळता राज्य सरकारची सर्व कार्यालये, त्यांच्याशी संबंधित संस्था आणि उपक्रम 17 एप्रिल रोजी रामनवमीच्या निमित्ताने बंद राहतील.

Ramnavami holiday
 
भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, जानेवारीत रामजन्माला  सुट्टी जाहीर न केल्याने मी राज्य सरकारवर टीका केली होती, Ramnavami holiday आज राज्य सरकारला सुट्टी जाहीर करणे भाग पडले आहे.
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही ट्विटरवर आपल्या पोस्टमध्ये ममता सरकारचा समाचार घेतला आहे. त्यांनी लिहिले की, 'ममता बॅनर्जींनी आपली हिंदुविरोधी प्रतिमा सुधारण्यासाठी हे केले आहे. खूप उशीर झाला असला तरी… महत्त्वाचे म्हणजे रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी.