तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Nitin Bhutda birthday भारतीय जनता पार्टीच्या यवतमाळ-पुसद जिल्ह्याचे समन्वयक तथा यवतमाळ-वाशिम लोकसभेचे प्रभारी नितीन भुतडा यांचे जन्मदिनानिमित्त 7 मार्च रोजी आयोजित सांस्कृतिक महोत्सवास हजारोंच्या सं‘येने प्रेक्षकांची उपस्थिती होती. नितीन भुतडा मित्र परिवाराच्या वतीने आयोजित जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या मैदानावर आयोजित सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवीत हजारो प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

व्यासपीठावर हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, आमदार नामदेव ससाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, संजय पुज्जलवार यांनी नितीन भुतडा यांचा भव्य गुलाब पुष्पहार अर्पण करून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. Nitin Bhutda birthday राज्यातील घराघरात मनोरंजन वाहिनीवरून पोहचलेल्या महाराष्ट्राच्या हास्यजत्रा या प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमातील अंशुमन विचारे, प्राजक्ता गायकवाड, शिवाली परब, प्राजक्ता हनमघर, प्रभाकर मोरे या कलाकारांच्या विनोदाने प्रेक्षकात कमालीचा हशा पिकला होता. तर सुप्रसिद्ध गायक अक्षता सावंत, चेतन लोखंडे यांच्या गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
विनोदी एक्सप्रेस निवेदक जयंत भालेराव यांचीही त्यात भर पडली. तर प्रसिद्ध लावणी साम्राज्ञी माधुरी पवार हिने आपल्या पारंपरिक लावणी नृत्याने प्रेक्षकांमधून प्रचंड दाद मिळविली. 7 मार्च रोजी सकाळी 8 वाजता औदुंबर वृक्षारोपण समितीद्वारे गार्डन व देवीच्या टेकडी परिसरात वृक्षपूजन करण्यात आले. तर सकाळी 10 वाजता स्वप्नपूर्ती ग्रुपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नितीन भुतडा यांची फळ तुला करण्यात आली. 11 वाजता श्रीराम मंगल कार्यालयात अतुल खंदारे मित्र परिवाराच्या वतीने भुतडा यांची लाडू तुला भाजपा प्रदेश कार्येकारिणी सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशी यांचे अध्यक्षतेत करण्यात आली. सत्कार सोहळ्यास उत्तर देताना नितीन भुतडा यांनी आपणाकडून केला जाणारा सत्कार म्हणजे जबाबदारी वाढविणारा क्षण आहे. जनसेवेच्या माध्यमातून आपल्या ऋणातून उत्तराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लाडू तुला सोहळ्याचे सूत्रसंचालन भाजपा शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार यांनी केले. तर आभारप्रदर्शन पवन मेंढे यांनी केले.