chicken pox उन्हाळ्याची चाहुल लागताच उष्णताही वाढली असून परिणामी कांजण्यांचा आजारही वाढला आहे. रोज सरासरी 5 ते 10 टक्के रुग्ण कांजण्यांचे येऊ लागले आहेत. कांजण्या हा प्रामुख्याने लहान मुलांचा आजार आहे. व्हारीसोला झोस्टर या विषाणूमुळे हा आजार होतो. हा आजार एकदा येऊन गेला, की परत होत नाही. पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात व प्रौढावस्थेत नागीणच्या रूपाने प्रकट होतात. हा आजार साधारणपणे उन्हाळ्याच्या सुरुवातीस होतो.
जंतूचा रुग्णाच्या शरीरात प्रवेश झाल्यावर 10 ते 21 दिवसांत लक्षणे दिसायला सुरुवात होते. पुढील 5 ते 10 दिवसांपर्यंत ती तशीच राहतात. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दिसणारा हा आजार आहे. बरेना तापाने त्याची सुरुवात होते. काही तासात, एक-दोन दिवसात डोके, मान किंवा शरीरावर तांबूस रंगाचे लहान पुरळ येऊ लागतात. chicken pox पुढील 12 ते 24 तासात पुरळावर खाज सुटते, पुरळ पाण्याने भरतात. दोन-पाच दिवसात त्यांच्यात वाढ होते. जुन्याबरोबर नवे पुरळ येतच राहतात. कधी-कधी शरीराच्या सर्व त्वचेवर पुरळ उठतात. काहींमध्ये तोंडात, नाकात, कानात, योनिमार्ग व गुदमार्गात पुरळ उठतात. काही रुग्णांमध्ये पुरळांची सं‘या कमी असते. शरीरावर 250-500 पुरळ येणे सर्वसामान्य बाब आहे. कालांतराने त्यावर खपली धरते. खपल्या पडून जातात. पुरळ खाजवले नाहीत तर डाग पडत नाहीत. खाजविल्याने पुरळामध्ये जंतु संसर्ग होतो. कधीकधी पुरळ आलेल्या ठिकाणी त्वचा अधिक काळवंडते. खाजेचे प्रमाण कमी-अधिक असते. काही कांजण्यांच्या रुग्णांत डोके व पोटदुखी, ताप अशी लक्षणे दिसतात. पाच ते दहा दिवसात रुग्ण पूर्ण बरा होतो. प्रौढ रुग्णांत आजाराची तीव‘ता वाढते. सुदृढ बालकांना कांजण्यांसाठी वैद्यकीय उपचारांची गरज नाही. खाज कमी करायला अॅलर्जी प्रतिबंधात्मक औषधे देतात.