मानोरा,
Savitribai Phule ओबीसी संवर्गातील मागास विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात येत असून, केंद्रीय सुचीमध्ये ओबीसी संवर्गात समाविष्ट असणार्या परंतु राज्यात विमुक्त जाती भटया जमाती या संवर्गात समाविष्ट असणार्या जातींना या योजनेमधून वगळण्याची शयता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यात भटके विमुक्त म्हणून ओळखल्या जाणार्या व केंद्रीय सूचीमध्ये ओबीसी संवर्गात समाविष्ट असणार्या विमुक्त जाती व भटया जमातींचा समावेश ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेमध्ये करण्याची विनंती अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी शासनाकडे केली आहे.
तांडा सुधार समिती या संघटनेने इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण मंत्री ना.अतुल सावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कॅबिनेट मंत्री ना.संजय राठोड यांना निवेदन पाठवून, डोंगर दर्या, व दुर्गम भागात राहणार्या अतिमागास भटया विमुक्तांच्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी केली आहे. या योजने अंतर्गत बाहेरगावी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना, वसतिगृह भत्त्ता, निर्वाह भत्ता, शिक्षण भत्ता म्हणून साठ हजार रुपये प्रती विद्यार्थी प्रती महिना शासन देणार असल्याची माहिती विविध माध्यमाद्वारे मिळत असल्याची माहिती नामा बंजारा यांनी दिली.Savitribai Phule योजनेमुळे ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फार मोठी मदत मिळणार असल्यामुळे अखिल भारतीय तांडा सुधार समितीने शासनाचे अभिनंदन करतानाच या योजनेचा लाभ विमुक्त भटया प्रवर्गातील होतकरू विद्यार्थ्यांना देण्याची मागणी केली आहे.