साखरखेर्डा,
Prahlad Maharaj Birth Festival : गोविंद रामानंद स्वामी श्री प्रल्हाद महाराज संस्थानमध्ये 5 मार्च ते 11 मार्च या सप्ताहात श्रींचा महोत्सव साजरा करण्यात आला . 11 मार्च रोजी साखरखेर्डा नगरितून भव्य रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली .
श्री प्रल्हाद महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त साखरखेर्डा येथील संस्थान मध्ये 5 मार्च पासून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . सकाळी काकडा आरती , श्रींचा अभिषेक सोहळा , श्रींची उपासना , पालखी मिरवणूक , किर्तन , प्रवचन , भजन , गायन नित्य नियमाने आयोजन करण्यात आले होते . पंकज किंबहुने , रामदास आचार्य , वसू भारद्वाज यांची प्रवचन सेवा तर तेजस्विनी धानोरकर , डॉ . पुष्कर महाराज गोसावी , प्रनव जोशी , मंगेश हिवरेकर यांची किर्तन सेवा आणि कु. रसिका मुखर्जी , रोहन गावंडे , कल्याण मोहनराव यांच्या भक्तीगीत , भावगीत कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय झाले होते .
10 मार्च रोजी 12 :40 वाजता श्रींच्या जन्मोत्सवा निमित्त हजारो भाविकांनी गुलाल पुष्प उधळून जन्मोत्सव साजरा केला . त्यापुर्वी सद्रगुरु भक्त रामदास आचार्य यांनी श्री प्रल्हाद महाराज यांच्या कार्यांचा आणि रामनाम सेवेचा अनुभव प्रवचनातून उलगडून दाखवला. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले . 11 मार्च रोजी सकाळी मंदीरातून महाराज श्रींची भव्य रथातून मिरवणूक काढण्यात आली . महाराज श्रींच्या घरापर्यंत महिलांनी सुबहक रांगोळी काढून भक्तीभावाने पूजा केली तेथे श्रींचे स्मारक लोकार्पण सोहळा पार पडला .