सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य या विषयावर व्याख्यान

    दिनांक :13-Mar-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
कळंब, 
Savitribai Phule स्थानिक इंदिरा महाविद्यालय आणि कला वाणिज्य महाविद्यालय, बोरीचंद्रशेखर यांच्या मराठी विभागातील सामंजस्य करार अंतर्गत ‘सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्यङ्क या विषयावर प्राचार्य डॉ. दिलीप खुपसे यांचे व्याख्यान पार पडले. प्राचार्य डॉ. पवन मांडवकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोरीचे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप खुपसे व मराठी प्राध्यापक परिषदेचे सचिव प्रा. अतुल सारडे उपस्थित होते.
 

सावित्री बाई  
 
आपल्या प्रभावी व्याख्यानात त्यांनी सावित्रीबाईंच्या शिक्षण विषयक कार्याची तसेच त्यांच्या साहित्याची माहिती दिली. ‘सावित्रीबाई फुले यांचा वारसा प्रत्येक विद्यार्थिनीने जपला तर त्यांची प्रगती निश्चित आहेङ्क, असे प्रतिपादन डॉ. दिलीप खुपसे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पवन मांडवकर यांनी सावित्रीबाईंच्या सेवाभावी वृत्तीची व सर्व व्यापक कार्याची माहिती दिली. यावेळी अनेक विद्याथ्र्यांनीसुद्धा सावित्रीबाईच्या जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगांवर प्रकाश टाकला.या कार्यक्रमाचे संचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. वीरा मांडवकर यांनी केले.Savitribai Phule या कार्यक्रमाला प्रा. राम भुरके, प्रा. पल्लवी एकोणकर, प्रा. शिवानी चंदनखेडे, इंदिरा महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.