भारताला प्रथमच आशियाई वेटलिफ्टिंगचे यजमानपद

13 Mar 2024 11:22:57
नवी दिल्ली, 
Asian Weightlifting भारताला प्रथमच आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी गुजरात पुढे आले आहे. ही चॅम्पियनशिप 2026 मध्ये अहमदाबाद किंवा गांधीनगर येथे होणार आहे. भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष सहदेव यादव यांच्या म्हणण्यानुसार, ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपदरम्यान त्यांनी आशियाई वेटलिफ्टिंगसाठी बोली लावली, ती स्वीकारण्यात आली. सोमवारी त्यांनी गुजरात सरकारचे प्रधान सचिव अश्वनी कुमार यांच्यासमोर चॅम्पियनशिप आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला, जो मान्य करण्यात आला.
 
vnhfgyf
 
चॅम्पियनशिपचा सर्व खर्च ते उचलतील, असे आश्वासन गुजरात सरकारने दिले आहे. यामध्ये 50 हजार यूएस डॉलर (सुमारे 41 लाख रुपये) च्या बोली खर्चाचाही समावेश आहे. Asian Weightlifting भारत 2018 मध्येही ही चॅम्पियनशिप आयोजित करणार होता, परंतु ती आयोजित होऊ शकली नाही. आतापर्यंत देशात वरिष्ठ आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आलेले नाही. या चॅम्पियनशिपनंतर तो 2027 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठीही बोली लावणार असल्याचे सहदेव सांगतात. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये चीन, इंडोनेशिया, उत्तर कोरिया, जपान यासारखे वेटलिफ्टिंग पॉवरहाऊस देश सहभागी होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0