१६ मार्चला "काय ग सखु, बोला दाजीबा" सुरवंदिता द्वारा प्रस्तुत

13 Mar 2024 13:07:55
नागपूर,
Survandita शनिवार दिनांक १६ रोजी सायंकाळी ६वाजता, सायंटिफिक सभागृह, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर, येथे "सुरवंदिता" आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय ,दादा कोंडके आणि अशोक सराफ यांच्यावर आधारित एक मराठी गाण्यांचा दर्जेदार कार्यक्रम दादा मामांची गाणी  "काय ग सखु... बोला दाजीबा"हा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रमुख उपस्थितीत सादर करण्यात येणार आहे.

dada 
   
उमा रघुरामन व  हेमंत दारव्हेकरच्या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जथे करणार आहे.Survandita गायक कलाकार हेमंत दारव्हेकर, उमा रघुरामन, गोपाल अय्यर, गीता राजगोपालन, आशुतोष चाहांदे, सुनीता कांबले, कल्पना गणवीर, ब्रजेश जोशी, विजया वाईंदेस्कर, श्याम बापटे, आरती बुटी आणि विजय जथे आपली गाणी सादर करणार आहे.या कार्यक्रमाचे संगीत संयोजन महेंद्र ढोले आणि ग्रुप यांचे आहे.सुरवदिंताचा हा कार्यक्रम संगीतप्रेमी साठी नि:शुल्क आहे.
सौजन्य: विजय जथे,संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0