शिवमहापुराणातून महादेवाच्या महिमेचे दर्शन : माजी आ. अग्रवाल

    दिनांक :13-Mar-2024
Total Views |
गोंदिया, 
Shiv Mahapuran : शिवमहापुराणातून महादेवाच्या महिमेचे दर्शन होते. सृष्टीची निर्मिती व समुद्रमंथनातून निघालेले विष प्राशन करुन महादेवांनी सृष्टीचे केलेल्या रक्षणाचे सजीव दर्शन शिवमहापुरातून होते. आपण भाग्यवान आहोत, महादेवाच्या महिमांचे श्रवण वृंदावन धामच्या ममतादीदी किशोरी यांच्या ओजस्वी वाणीतून ऐकायला मिळत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
 
 
KSfaj
 
 
तालुक्यातील रतनारा येथे आयोजित श्रीमद् शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञाला भेटीदरम्यान त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रसंगी माजी आ. अग्रवाल यांनी ज्ञानयज्ञाला माल्यार्पण करुन ममतादीदी किशोरी यांचा आशीर्वा घेतला. ते पुढे म्हणाले, अयोध्येत भव्य राममंदिर निर्माण व प्राणप्रतिष्ठेमुळे देशात राममय वातावरण असून गावागावात शिवमहापुराण कथा, श्रीराम कथा, श्रीमद् भागवत कथेच्या माध्यमातून जनता भगवंताचे चिंतन, मनन करीत आहे. यापूर्वी असे धार्मिक वातावरण कधीच पाहण्यात आले नाही. देशात आता खर्‍या अर्थाने रामराज्य स्थापित झाले आहे. कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन नागपुरे, जिल्हा परिषद सदस्य अंजली अटरे, विजय उईके, पंचायत समिती सदस्य निखिल चिखलोंडे, आय. सी. बिरनवार, बी. पी. राऊत, राजकुमार बसेने, दुर्योधन भोयर, मदनलाल चिखलोंडे, तुलेश ढेकवार, मंगेश बसेने, शामकुंवर बिजेवार, नेतलाल धुवारे, सदाशिव दसरे, चैतनलाल दमाहे, योगीप्रसाद धामळे आदी उपस्थित होते.