नागपूर,
Ninad Sangeet Vidyalaya निनाद संगीत विद्यालय तर्फे स्वर आशा भाग २ हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात संपन्न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्ष शैला गोडबोले यांनी सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात हेमा पंडित, मृदुला सुदामे यांच्या सतार वादनाने झाली, त्यांना सोनाली सहस्त्रबुद्धे यांनी तबल्यावर साथ केली,
विद्यालयाच्या संचालिका रेखा साने यांनी झुटे नैना बोले हे गीत सादर केले, सोनिया तोकसिया, प्राजक्ता तिजारे, पारुल लाभे यांच्या गाण्यांना वन्स मोअर मिळाला, अपर्णा चकोले, अपूर्वा नाईक, अलका धोंडरिकर, प्रणिता कोत्पल्लीवर, अबोली बाळ, मोनाली दरव्हेकर, मृदुला सुदामे, रोहिणी बापट, आद्द्या पांडे , या सगळ्यांची प्रस्तुती अतिशय सुंदर होती,Ninad Sangeet Vidyalaya छोटे उस्ताद अनुराग साने, मृण्मयी साने, कार्तिकी पुराणिक, सानवी राजूरकर यांनी गायलेल्या गीताला भरभरून प्रतिसाद मिळाला, एक उत्कृष्ट कार्यक्रम, उत्तम सादरीकरण असं या कार्यक्रमाचं वर्णन करता येईल, रसिक श्रोत्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
सौजन्य:अंजली पांडे,संपर्क मित्र