उमेदच्या सखींना सरसकट मानधनाचा लाभ मिळणार

खासदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नाचे फलीत

    दिनांक :13-Mar-2024
Total Views |
वाशीम, 
Umaid's friends उमेद अंतर्गत काम करणार्‍या सखींचे मानधन सरकारने दुप्पट केल्यानंतरही जुन्याच मुल्यांकन पद्धतीनुसार मानधन दिले जात होते. या संदर्भात मुल्यांकनाच्या या जुन्या पध्दतीमुळे सखींना सरसकट मानधन मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने मुल्यांकनाची जुनी पध्दत बंद करुन सखींना सरसकट मानधन देण्याचे निर्देश खासदार भावना गवळी यांनी उमेद चे एम.डी. रुपेश जयवंशी यांना दिले होते. दरम्यान चार दिवसातच यासंर्भातील जीआर काढण्यात आला असून, आता सर्वच सखींना सरसकट मानधन देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
 

umid sakhi 
 
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सर्व कर्मचारी व कॅडर यांच्या मानधनवाढी संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला. यासाठी खासदार भावना गवळी यांनी सरकारकडे सतत पाठपुरावा केला होता. जिल्ह्यातील शेकडो सखी ह्या मागील आठ ते दहा वर्षा पासून उमेद च्या अभियाना मध्ये विविध गावामध्ये महिलांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविका वाढीकरिता कार्यरत आहे. या सखी रोज अनेक गावांत भेटी देऊन उपजीविका बाबत सभा घेणे, विविध शासकीय विभागासोबत समन्वय ठेऊन त्यांचा लाभ महिला बचत गटांना मिळवून देणे हे कामे नियमित करीत आहेत. मुल्यांकना नुसार जेवढे मानधन निघाले तेवढेच काढत असल्याच्या तक्रारी होत्या.Umaid's friends दरम्यान भावना गवळी यांनी थेट उमेद चे एम. डी. रुपेश जयवंशी यांच्याशी भ्रमनध्वनी वर बोलून सखींच्या मानधनाचा मुद्दा समजवून सांगीतला. ही बाब सरकारच्या लक्षात आनून दिल्याने १२ मार्च २०२४ रोजी जीआर काढून राज्य शासन निधीमधून देय असलेले मासिक मानधन समुदाय संसाधन व्यक्तींना सरसकट देण्याचे आदेश काढण्यात आले आहे. या जीआर मुळे राज्यातील हजारो सखींना वाढीव मानधन मिळणार आहे. त्यामुळेच सखींनी भावना गवळी यांचे आभार मानले आहे.