आमदार निधीतील रस्त्याच्या कामात रेती ऐवजी चुरीचा वापर

13 Mar 2024 18:04:49
उंबर्डा बाजार,
MLA fund उंबर्डा बाजार ग्रामपंचायत हद्दीत आमदार स्व. राजेंद्र पाटणी यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमाअंतर्गत सिमेंट क्रांक्रीटि रस्ताचे काम भवानी माता मंदिर ते बौद्ध विहार पर्यंत सुरु आहे. सदर कामात अंदाजपत्रकाला बगल देवून निकूष्ट दर्जाचे साहीत्य वापरून काम होत असल्याने व सिमेंट क्रॉकिट रस्ता बनविताना रस्ताचे खोदकाम करून त्यावर डंबर गिट्टी मुरुम टाकून त्याची दबाई करणे आवश्यक असतांना सुद्धा तसे न करता जमिनीवरच क्रॉकीट टाकून रस्ता बनविल्यामुळे कामाविषयी शंका निर्माण होत आहे व हा रस्ता कीती दिवस टिकेल यावर ग्रामस्थ मंडळी मध्ये चर्चा करीत आहे.
 

MLA Fund 
 
उंबर्डा बाजार येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये आमदार स्व राजेंद्र पाटणी यांच्या स्थानिक विकास निधी कार्यक्रमा अंतर्गत सिंमेट क्रांक्रीट रस्त्याच्ये काम अतिशय थातुरमातुर पद्धतीने सुरू आहे. सदर रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन वरीष्ठ नेतेमंडळींच्या उपस्थित पूर्ण झाले असून, सदर काम होत असतांना कामाला मात्र अंदाजपत्रकाची जोड नाही. सदर कामात दिरंगाई होत असल्याने रस्त्याच्या मजबुती विषयी शंका निर्माण होत आहे. गावातील रस्ते एक वेळ बनले की, त्याकडे पुन्हा बघीतले जात नाही. त्यात हा रस्ता कीती दिवस टीकेल याविषयी गावकर्‍यांमध्ये चर्चा होत आहे.MLA fund सदर काम सुरू झाले तेव्हा पासुन एकदाही सदर काम पाहणी करणार्‍या सार्वजनीक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यानी एकदाही भेट दिली नसल्याचे समजते. सदर काम कंत्राटदाराच्या मर्जीने सुरू असल्याने एजन्सी असलेल्या कंत्राटदारावर कार्यवाही करून सदर एजन्सी काळ्या यादीत टाकावी व जो पर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत संबधिताचे बिल अदा करू नये अशी मागणी जनमानसानतून होत आहे.
Powered By Sangraha 9.0