प्रतापगड पहाडीवर प्लॅस्टिक संकलन, स्वच्छता अभियान

    दिनांक :16-Mar-2024
Total Views |
अर्जुनी मोरगाव, 
Pratapgad Hills : तालुक्यातील प्रतापगड जवळ असलेल्या पहाडीवर महाशिवरात्रीच्या यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक महादेव दर्शनासाठी येतात. यानिमित्त होणार्‍या प्लॅस्टिकचे संकलन करुन शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबविले.
 
 
SJKZFH
 
 
प्रतापत्रगडची ही यात्रा जवळपास आठ दिवस चालते. विदर्भाच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक भक्त मोठ्या श्रध्देने महादेव दर्शनासाठी येतात. त्यामुळे प्रतापगड गावापासून तर पहाडावर असलेल्या महादेव मूर्तीपर्यंत येथे विविध दुकाने लावली. यासाठी जिल्हा प्रशासन भाविकांच्या सेवेसाठी तत्पर असते. सेवाभावी मंडळी व संस्थांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या यात्रेतील दुकानांमुळे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक व कचरा प्रदूषण होणे स्वाभाविक आहे. त्याचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवून एक कौतुकास्पद कार्य केले आहे.
 
प्रतापगड पहाडावरील रस्त्याच्या दुतर्फा कडेला पडून असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या संकलित करून व महादेवाच्या पहिल्या पायरीजवळ स्वच्छता अभियान राबवून लोकांना हा परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. यासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मोतीलाल दर्वे यांनी पुढाकार घेतला. रासेयोच्या 40 स्वयंसेवकांनी श्रमदानातून स्वच्छता या उपक्रमाचे येथील सरपंच श्री भोजराम लोगडे यांनी कौतुक केले. या अभियानात स्वयंसेवक तन्मय चांदेवार, रागिनी पारसमोडे, कैलास नंदरधने, श्रद्धा कुंभरे, चैतन्वी पुस्तोडे, रागिणी कापगते, श्रीवर्धन गोंडाने, धिरज रंगारी, रिकीत गजबे, राम नैताम, प्राजक्ता मेश्राम आदी विद्यार्थी सहभागी झाले.