अहमदाबाद,
Attack on foreign students in Gujarat अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठात रविवारी रात्री उशिरा काही तरुणांनी परदेशी विद्यार्थ्यांना मारहाण केली. हे परदेशी विद्यार्थी आफ्रिका, अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांतील आहेत. तरुणांच्या एका गटाने नमाज अदा करू नये म्हणून दबाव टाकल्याचा आरोप जखमी विद्यार्थ्यांनी केला आहे. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोहली आम्हाला कोणत्याही किंमतीत हवा आहे... 
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी गुजरात पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांशी बोलून आरोपींना लवकरात लवकर अटक करून निष्पक्ष तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. Attack on foreign students in Gujarat विद्यार्थ्यांनी सांगितले की कॅम्पसमध्ये कोणतीही मशीद नाही, म्हणून ते तरावीहची नमाज अदा करण्यासाठी वसतिगृहात जमले होते, रमजानमध्ये रात्रीची नमाज अदा केली जाते. काठ्या आणि चाकू घेऊन आलेल्या जमावाने वसतिगृहात घुसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला आणि खोल्यांची तोडफोड करण्यात आली. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला.
विद्यार्थ्याने सांगितले की, जखमी झालेल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका आणि तुर्कमेनिस्तानमधील प्रत्येकी एक आणि आफ्रिकन देशांतील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. घटनेच्या अर्ध्या तासानंतर पोलीस आले. तोपर्यंत जमाव पळून गेला होता. जखमी विद्यार्थी रुग्णालयात असून त्यांनी दूतावासांना माहिती दिली आहे.