नागपूर,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी Dattatreya Hosbale-RSS दत्तात्रेय होसबळे यांची पुन्हा निवड झाली आहे. संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात सुरू आहे. दर तीन वर्षांनी संघात निवडणूक होत असते. Dattatreya Hosbale-RSS त्यानुसार आजच्या अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची पुढील तीन वर्षांसाठी (2024-2027) पुन्हा एकमताने निवड करण्यात आली. यानंतर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी होसबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
दत्तात्रेय होसबळे यांचा जन्म 1954 मध्ये कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील होसबळे गावात झाला. Dattatreya Hosbale-RSS बंगलोर विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दत्तात्रेय होसबळे 1968 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी संघाचे स्वयंसेवक झाले. 1972 मध्ये अ.भा. विद्यार्थी परिषदेत ते कार्यरत होते. 1978 मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर ते संघाचे प्रचारक बनले. विद्यार्थी परिषदेत प्रांतीय, प्रादेशिक आणि अखिल भारतीय स्तरावर विविध जबाबदार्या पार पाडल्यानंतर, 1992 ते 2003 अशी 11 वर्षे अ. भा. संघटनेचे मंत्री होते.Dattatreya Hosbale-RSS
2003 मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-बौद्धिक प्रमुख बनले. 2009 ते 2021 या कालावधीत सह सरकार्यवाह पदावर कार्यरत होते. 2021 पासून ते संघाच्या सरकार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. Dattatreya Hosbale दत्तात्रेय होसबळे यांंची मातृभाषा कन्नड असून इंग्रजी, तमिळ, मराठी, हिंदी व संस्कृतसह अनेक भाषांचे त्यांना ज्ञान आहे. ते असिमा या कन्नड मासिकाचे संस्थापक संपादकही होते. 1975-77 च्या आणीबाणीच्या काळात त्यांनी चळवळीत सक्रिय भूमिका बजावली आणि सुमारे 14 महिने ‘मिसा’ अंतर्गत तुरुंगात राहिले. Dattatreya Hosbale-RSS ते भारतात शिकणार्या परदेशी विद्यार्थ्यांची संघटना विश्व विद्यार्थी युवा संघटनेचे संस्थापक सरचिटणीस होते. अमेरिका, युरोपसह जगातील अनेक देशांना त्यांनी भेट दिली आहे.