नाथ नंगे महाराज यांच्या पालखीचे मंगरुळनाम्ध्ये स्वागत

17 Mar 2024 15:54:58
मंगरुळनाथ, 
Nath Nange Maharaj संत नाथ नंगे महाराज डव्हा येथील पालखी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री क्षेत्र माहूरगड येथे जात असतांना माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या मंगरुळनाथ येथील निवास्थानी पालखीचे मोठया थाटामाटात स्वागत करण्यात येत असते, यावर्षीही १२ दुपारी पालखीचे स्वागत जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सपत्नीक पूजा अर्चना करून केले.
 

nath nage maharaj 
 
श्रीक्षेत्र डव्हा येथील नाथ नंगे महाराज यांची पालखी माहूरगड येथे जात असताना दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा टाळ मृदंगाच्या गजरात फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये नाथ नंगे महाराजांचा मुखवटा विराजमान होता. महाराजांच्या पालखीचे मंगरुळनाथ नगरीत आगमन झाले. पालखीचे ठिकठिकाणी पूजन करुन स्वागत करण्यात आले.Nath Nange Maharaj त्यानंतर जिप अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व प्रिया ठाकरे यांनी संत नाथ नंगे महाराज यांच्या पालखीतील पादुकांचे पूजन केले, तद्नंतर शेकडोंच्या वर पालखीतील वारकर्‍यांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी माजी मंत्री सुभाष ठाकरे, राम ठाकरे, जिप सदस्य आर के राठोड, कांचन मोरे, पस सभापती भगत, माजी सभापती भास्कर पाटील, रमेश नांवधर, डॉ. नवल असावा, उमेश गावंडे, जय गुप्ता, डॉ. खोडके, मनोज पाटील, सचिन राऊत, बाळू पाटील, बबनराव मिसाळ, शालीकराम पाटील, रवी राऊत यांचेसह नवीन सोनखास विठ्ठल मंदिरातील सर्व सदस्य, नाथ नंगे महाराज परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0