‘तिसरी बार मोदी की सरकार’

17 Mar 2024 18:38:08
दखल
 
भाजपा राजवटी अंतर्गत गेल्या दशकात महिला सक्षमीकरणात उल्लेेखनीय प्रगती झाली आहे. केंद्र सरकारने महिला सशक्तिकरणासाठी तसेच महिलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. प्रगतीचा, विकासाचा हा उत्सव साजरा करण्यासाठी काश्मिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभाला प्रामुख्याने उपस्थित होते. काश्मिरातील शहरी व ग्रामीण भागातील मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येने श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (एसकेआयसीसी) येथे शांती मोर्चात सहभाग घेतला.
 
 
Muslim-Mahila-3
 
हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पृष्ठभूमीवर झाला. यावेळी समारंभाला उपस्थित मुस्लिम महिलांनी PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला स्पष्टपणे पाठिंबा दर्शवत ‘तिसरी बार मोदी की सरकार, अबकी बार 400 पार’ अशा खणखणीत घोषणा पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिल्या. गेली अनेक दशके अशांतता, दहशतवाद, अस्थिरता, भय व अस्वस्थतेचा विदारक अनुभव घेतलेल्या काश्मिरातील महिलांनी 370 कलम निष्प्रभ झाल्यानतंतर प्रथमच मोकळा श्वास घेतला. मोदी सरकारच्या प्रभावी योजनांचा लाभ काश्मीरच्या मुस्लिम महिलांना देखील मोठ्या प्रमाणात झाला. केंद्रातील मोदी सरकार आपल्यामागे खंबीपणे उभे आहे, असा विश्वास या मुस्लिम महिलांच्या मनात निर्माण झाला. म्हणूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शवत त्यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा तिसर्‍यांदा सरकार बनावे, अशी इच्छा उत्स्फूर्तपणे व्यक्त करीत त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. पंतप्रधानांनी आपल्या या ऐतिहासिक दौर्‍यात जम्मू आणि काश्मीरमधील विविध क्षेत्रांसाठी हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची घोषणा केली. ‘काश्मिरी महिलांसाठी अभूतपूर्व उत्थान आणि स्वातंत्र्याच्या युगाची घोषणा’ केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी हजारो काश्मिरी मुस्लिम महिलांनी भगव्या फिती लावून ‘आभार पदयात्रा’ काढली. हा खरोखरच अभूतपूर्व असा प्रसंग होता.
 
 
इंडियन मायनॉरिटीज फाऊंडेशन (आयएमएफ) अर्थात भारतीय अल्पसंख्यकच्या सह-संस्थापक प्राध्यापक हिमानी सूद यांच्या नेतृत्वाखाली शांतता पदयात्रा शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (एसकेआयसीसी) च्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरू झाली आणि श्रीनगरच्या रस्त्यांवरून फिरली. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पुन्हा सत्तासूत्रे हाती घ्यावी अशी मनापासून इच्छा व्यक्त करीत पंतप्रधानांच्या समर्थनार्थ या मुस्लिम महिलांनी ‘हम भी हैं मोदी का परिवार’चा नारा दिला.
 
 
मोदींना आपले ‘भाईजान’ म्हणून संबोधत, या महिलांनी खोर्‍यातील कलम 370 निष्प्रभ करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या ‘धाडसी आणि दूरदर्शी’ निर्णयाची प्रशंसा केली. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे काश्मिरात विकासाचे नवीन पर्व सुरू झाल्याची अनुभूती या महिलांना आली. एवढेच नव्हे तर राज्यात परिवर्तनाचे चक्र वेगाने फिरत असल्याचा अनुभवही या मुस्लिम महिलांनी घेतला. त्यामुळेच त्यांनी ‘तिसरी बार मोदी की सरकार’ चा नारा खणखणीतपणे दिला.
 
 
राज्यात 370 लागू असताना दहशतवादी कारवाया जोमात सुरू होत्या. संप, हरताळ बंद आणि दगडफेकीच्या घटना नित्याच्याच होत्या. मात्र, मोदी सरकारने 370 कलम हटविल्यातनंतर या सर्वच घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, यामुळेच केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सुलभ झाली आहे. तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत, विविध क्षेत्रांमध्ये वाढीव गुंतवणूक आकर्षित झाली आहे आणि दहशतवादाने त्रस्त राज्याला वाढीव पर्यटनामुळे अत्यंत बळ दिले आहे, असे शांती मोर्चात सहभागी महिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ‘बुखातियार ख्वातीन, ताकतवार मुल्क : मोदी शुक्राना’ शीर्षकांतर्गत या कार्यक्रमात मोठ्या संख्येत उपस्थित लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा पाठिंबा मिळाला. यानिमित्त आयोजित शांती मोर्चात मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला आणि PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकसित भारत व्हिजन’साठी मनापासून पाठिंबा आणि योगदान देण्याची शपथ घेतली.
 
 
कलम 370 रद्द करून पाच वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु या कालावधीत झालेली प्रगती मागील 65 वर्षांच्या तुलनेत अतुलनीय आहे, असे शांती मोर्चात सहभागी मुस्लिम महिलांनी स्पष्टपणे सांगितले. मोदींच्या ‘विकासाच्या दशका’चे स्वागत करताना, ‘जन्नत-ए-बेनझीर’ या काश्मीरमधील संघटनेच्या महिलांनी सांगितले की, मुस्लिम महिलांना सर्व दृष्टीने सक्षम बनवण्याबरोबरच तसेच काश्मिरात त्यांच्यासाठी राहण्यासाठी सुरक्षित स्थान निर्माण करण्याबरोबरच मोदी सरकारच्या सर्वसमावेशक धोरणांमुळे काश्मीर खोर्‍यात शांतता, समृद्धी आणि सर्वांगीण विकासाचा प्रारंभ झाला. मोदी सरकारची सर्वसमावेशक विकास धोरणे ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास’ चे खरे सार प्रतिबिंबित करतात. मोदी सरकारच्या अनेक योजनांच्या अंतर्गत लाभ मिळाल्याने खर्‍या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण झाले आहे आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच काश्मीरला राहण्याच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित ठिकाण बनवले आहे, असे या मुस्लिम महिलांनी सांगितले. तिहेरी तलाकची समाप्ती, प्रस्तावित समान नागरी कायदा या धाडसी निर्णयांमुळे मुस्लिम महिलांनी मोदींवर विश्वास दर्शविला असून 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसर्‍यांदा सत्तासूत्रे हाती घेतली पाहिजेत, असे या महिलांनी बोलून दाखविले. महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत घेतलेल्या निर्णयांचेही या मुस्लिम महिलांनी स्वागत केले. विशेषत: मुस्लिम महिला आणि तरुण त्यांचे भाषण ऐकण्यासाठी खूप उत्सुक होते. पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरच्या सर्वस्पर्शी विकासासाठी भविष्यातील रूपरेषा (रोडमॅप) सामायिक केल्यानंतर आणि विविध नवीन गुंतवणूक आणि विकास प्रकल्पांची घोषणा केल्यानंतर या महिलांमध्ये खूपच उत्साह संचारला.
 
 
मुस्लिम महिलांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला पाठिंबा देण्याची शपथ घेतली. ‘कलम 370 निष्प्रभ झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जम्मू आणि काश्मीरचा हा पहिला दौरा होता, ज्यात त्यांना स्थानिकांचा, विशेषत: मुस्लिम महिला आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंतप्रधानांना पाहण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची तसेच देशासाठीच्या भविष्यातील योजनांबद्दल त्यांचा दृष्टिकोन जाणून घेण्याच्या संधीची वाट पाहत असताना लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, असे इंडियन मायनॉरिटीज फाऊंडेशनच्या सह-संस्थापक प्रा. हिमानी सूद माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. विकासाचे युग सुरूच राहील, अशी ग्वाही देखील पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरच्या तरुणांना दिली. काश्मीरच्या प्रगतीला चालना देण्यासाठी 6400 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या नवीन विकास प्रकल्पांचे देखील पंतप्रधानांनी उद्घाटन केले. त्यामुळे लोकांमध्ये अधिकच उत्साह निर्माण झाला आहे, असेही प्रा. हिमानी सूद यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त काश्मीरच्या भूमीतील महिला प्रथमच मोठ्या एकत्र आल्या. या संमेलनाद्वारे त्यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेत सहभागी होण्यासाठी आणि 2047 पर्यंत भारत विकसित करण्यासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली, असेही प्रा. हिमानी सूद यांनी सांगितले.
 
 
श्रीनगरमधील मदिहा वसीम या स्थानिक मुस्लिम महिलेने पंतप्रधान मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, कलम 370 रद्द करून पाच वर्षे पूर्ण होत आहेत, परंतु या काळात झालेली प्रगती मागील 65 वर्षांच्या तुलनेत अतुलनीय आहे. PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात उल्लेेखनीय प्रगती केली आहे, मग ते शिक्षण, पर्यटन, व्यापार, आरोग्यसेवा किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, यामुळे काश्मिरात विकासाच्या अभूतपूर्व युगाला प्रारंभ झाला आहे. शिवाय, जम्मू आणि काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेत मोठे परिवर्तन झाले आहे. मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा काश्मीर हे सर्वोच्च पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून स्थापित केले आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने या क्षेत्राच्या उपजीविकेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी ठोस पावले उचलली आहेत. परिणामी, 2023 मध्येच पर्यटकांची संख्या 2 कोटींवर पोहोचली आहे. यावरून जम्मू आणि काश्मीर आता जगासाठी एक शांत आणि सुरक्षित ठिकाण असल्याचे दिसून येते, असेही मदिहा वसीम यांनी सांगितले.
 
 
काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील आरपी स्कूल नागबलच्या सल्लागार नजमू सहर म्हणाल्या, कलम 370 रद्द केल्यापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये शिक्षणाची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शिक्षणाने सर्व क्षेत्रातील विकसाचे दरवाजे उघडले आहेत. भूतकाळात आम्ही दहशतवाद पाहिला. त्या काळात खोर्‍यात तरुणांना शिक्षण घेता येत नव्हते. पण 2019 पासून गेल्या पाच वर्षांत खोर्‍यात शांतता नांदत आहे. आता तुम्हाला शिक्षणाची संधी मिळत आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी तरुणांना कौशल्य विकासासाठी आणि खोर्‍यात नवीन उद्योग (स्टार्टअप) स्थापन करण्यासाठी प्रेरित केले आहे. पंतप्रधान तरुणांना कर्ज आणि आवश्यक प्रशिक्षण देऊन मदत करत आहेत.
 
 
श्रीनगरातील रहिवासी आणि विद्यार्थिनी साहिबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे मनापासून कौतुक केले. ती म्हणाली, मी पंतप्रधान मोदींकडे एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून पाहते, जे मला त्यांच्यासारखे बनण्याची प्रेरणा देते. त्यांच्या कार्याचे, नीतिमत्तेचे अनुकरण करण्याची आणि आपल्या देशाच्या विकासात सक्रियपणे योगदान देण्याची माझी इच्छा आहे. पंतप्रधान मोदींचे नेतृत्व यशस्वी ठरले आहे. जम्मू-काश्मीर आणि भारतातील युवकांना भावनिक स्तरावर जोडण्याचे, त्यांच्यातील एकत्वाचा धागा अधिक बळकट करण्याचे कार्य पंतप्रधान मोदींनी केले आहे. भारत आणि जम्मू-काश्मीर प्रगतीच्या मार्गावर असाच पुढे जाण्यासाठी आपण नरेंद्र मोदींना पुन्हा तिसर्‍यांदा पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितो, असेही साहिबाने माध्यमांशी बोलताना सांगितले.
 
 
2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान
PM Modi नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच केंद्रात सरकार स्थापन व्हावे, अशी इच्छा जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम महिला उघडपणे व्यक्त करीत आहेत. पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या दौर्‍याप्रसंगी काश्मीरमधील मुस्लिम महिलांनी ‘तिसरी बार मोदी की सरकार’ असा खणखणीत नारा देऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आणि भाजपाच्या कारकीर्दीत महिला सक्षमीकरणातील प्रगतीची प्रशंसा केली.
(ऑर्गनायझरवरून साभार)
Powered By Sangraha 9.0