पंजाबमध्ये एनकाऊंटर...एक जवान शहीद !

Punjab-Encounter छापा मारायला गेलेल्या सीआयए टीमवर हल्ला

    दिनांक :17-Mar-2024
Total Views |
होशियारपूर,
 
 
Punjab-Encounter पंजाब पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये होशियारपूरमध्ये चकमक सुरू आहे. Punjab-Encounter सीआयएची चमू छापेमारी करायला गेलेली असताना, लपून बसलेल्या गुन्हेगारांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. Punjab-Encounter यामध्ये, एक पोलिस जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.
 
 
Punjab-Encounter
 
होशियारपूर जिल्ह्यातील मुकेरिया नावाच्या गावात, राणा मंसूरपूर नावाच्या व्यक्तीकडे अवैध शस्त्रसाठा असल्याची गोपनीय माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. Punjab-Encounter त्या आधारे कारवाई करण्यासाठी गेलेल्या चमूवर गुन्हेगारांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. दरम्यान, लपून बसलेल्या गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी पंजाब पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. Punjab-Encounter त्यांच्याकडे नेमका किती आणि कोणत्या शस्त्रांचा साठा आहे ? ते किती संख्येत आहेत? याची माहिती अद्याप मिळालेली नाही.