मतदानावेळी मॉस्कोवर युक्रेनचा हल्ला

    दिनांक :17-Mar-2024
Total Views |
- 35 ड्रोन पाडण्यात यश
 
मॉस्को, 
Russia-Ukraine War : रशियामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना शनिवारी रात्रीपासून युक्रेनने मॉस्कोवर जोरदार ड्रोन हल्ले केले. रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 35 ड्रोन्स पाडण्यात लष्कराला यश आले आहे. या हल्ल्यात जीवितहानी झालेली नाही. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी युक्रेनकडून ड्रोन हल्ले झाल्याची माहिती दिली. रशियामध्ये रा÷ष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच सलग तीन दिवस मतदान होत आहे. रविवारी मतदानाचा अखेरचा दिवस होता.
 
 
Russia-Ukraine War
 
Russia-Ukraine War : यादरम्यान शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी युक्रेनने ड्रोन हल्ले केले. मॉस्कोच्या दक्षिणेकडील कलुगा प्रदेश आणि ईशान्य भागातील येरोस्लाव्हल भागात हल्ले झाले. हे क्षेत्र युक्रेनच्या सीमेपासून 800 किमी अंतरावर आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, शनिवारी रात्रभर युक्रेनच्या सैन्याने मॉस्को व आसपासच्या परिसरात ड्रोन हल्ले केले. सीमावर्ती भागात युक्रेनच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात दोन नागरिक ठार तर तीन जखमी झाले. युक्रेनियला समर्थन देणार्‍या टोही गटाने सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला जो रशियन
पुतिनविरोधात तीन उमेदवार रिंगणात
रशियातील ड्युमाच्या उच्च सभागृहाने सुरुवातीला 17 मार्च रोजी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची तारीख घोषित केली होती. मात्र, यानंतर रशियन केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 ते 17 मार्चदरम्यान राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार देशात निवडणुका होत आहे. या निवडणुकीत व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात व्लादिस्लाव्ह दाव्हान्कोव्ह, लिओनिड स्लुत्स्की आणि निकोले खारिटोनोव्ह हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.