श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी

    दिनांक :17-Mar-2024
Total Views |
    
jogi 
 नागपूर, 
Malharrao Holkar पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर स्मृती समिती नागपूरच्या वतीने समितीच्या कार्यालय स्थळावर सौभाग्यनगर येथे 16 मार्च रोजी सरदार मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी राजमाता अहल्यादेवी होळकर व सरदार मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर स्मृती समिती (नागपूर) कार्याध्यक्ष डॉ. रमेश ढवळे, सचिव महादेव पातोंड, कोषाध्यक्ष विनोद बरडे, सहसचिव विठ्ठल निघोट, अनिल तांबडे तसेच सदस्य शरद उरकुडे, श्याम थोरात, विनोद भुजाडे, यशवंत कातरे, तसेच पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर स्मृती समिती महिला मंडळ अध्यक्ष वंदना बरडे, उपाध्यक्ष स्मिता तांबडे, कोषाध्यक्ष कामिनी तवले व इतर समाज बांधव उपस्थित होते.
सौजन्य:विरेंद्र  जोगी ,संपर्क मित्र