सुरवंदिता संस्थेचे अप्रतिम सादरीकरण...!

    दिनांक :18-Mar-2024
Total Views |
नागपूर,
Survandita सायंटिफिक सभागृहात दादा कोंडके यांची स्मृति आणि अशोक सराफ यांना मिळालेला महाराष्ट्र भुषण पुरस्कार या निमित्ताने यांच्या चित्रपटांच्या गाण्यांचा धमाल कार्यक्रम केन्द्रीय मंत्री  नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. वरील सांस्कृतिक कार्यक्रम सुरवंदिता या संस्थेने दादा -मामा स्पेशल अंतर्गत "काय ग सखु -बोला दाजीबा" या शीर्षकांतर्गत सादर करून एकच धमाल उडवुन दिली .  यात 'काय ग सखु - बोला दाजीबा ,चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर,ऋदयी वसंत फुलताना ,रावजी हात नका लावुजी पाहिलं कुणी तरी,गंगु तारुण्य तुझे बेभान,चल जेजुरीला जाऊ,झाल्या तिन्ही सांझा,काशी ग काशी,नाच नाच नाच राधे , अगं ढगाला लागली कळ अशी सर्व गाणी एकापेक्षा एक सरस असल्याने प्रेक्षकांना शेवट खिळवुन ठेवले.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण भारतील कलाकारांनी सर्व मराठी गाणी सादर केली.
 
sur 
   
या मध्ये उमा रघुनाथन ,गीता राजगोपालन, गोपाल अय्यर यांच्या सह हेमंत दारव्हेकर,, आशुतोष चहांदे,सुनीता कांबळे ,आरती बुटी ,ब्रजेश जोशी , शाम बापटे यांनी आपली कला सादर केली.Survandita संगीताचे सुरेख नियोजन महेंद्र ढोले यांनी केले तर विजय जथे यांनी खुमासदार संचालन करून दादा -मामा यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
सौजन्य: श्रीकांत पवनीकर,संपर्क मित्र