वन्यजीव उपचाराबाबत जनजागृती व्हावी

    दिनांक :18-Mar-2024
Total Views |
- अभिनेते सयाजी शिंदे यांचे आवाहन
 
नागपूर,
वन विभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये वन्यजीव उपचार कार्य होत असल्याने मला येथे भेट द्यावीशी वाटली. ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे कार्य प्रशंसनीय असून माझ्या हातून सुध्दा जनजागृतीचे कार्य व्हावे, यासाठी मी पूर्ण वेळ देणार असल्याची ग्वाही प्रसिध्द अभिनेते Sayaji Shinde सयाजी शिंदे यांनी दिली.
 
 
sayaji-shinde
 
उमरेड करांडला आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात भ्रमंतीवर असताना सयाजी शिंदे यांनी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला भेट दिली. यावेळी उपवनसंरक्षक भारत सिंह हाडा, राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते, सहाय्यक वनसंरक्षक विजय गंगावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी निलय भोगे आदी हजर होते. वन्यजीव उपचार कार्यात काम करणार्‍यांचे कौतूक करताना सयाजी शिंदे यांनी देवराई वाचविण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच वृक्ष लागवड क्षेत्रात मी स्वत: पुढाकार घेतला असल्याचे Sayaji Shinde सयाजी शिंदे यांनी सांगितले.