stipend तालुयातील मूळ निवासी आणि उपमुख्यमंत्री कार्यालयात अवर सचिव ह्या पदावर कार्यरत असलेले अमोल पाटणकर यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वयोवृद्ध कलावंतांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या कामी पुढाकार घेणारे अमोल पाटणकर यांच्या प्रति या ज्येष्ठ कलावंतांकडून आभार व्यक्त केले जात आहे.
विदर्भ लोक कलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी जानेवारी महिन्याच्या २४ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम येथे वृद्ध लोककलावंतांच्या न्याय मागणीसाठी शेकडो जेष्ठ कलावंतांच्या उपस्थितीत केलेल्या आंदोलनाची माहिती संघटनेचे पदाधिकारी कडोळे, नंदकिशोर कव्हळकर, लोमेश चौधरी यांनी पाटणकर यांना कारंजा भेटी दरम्यान निदर्शनास आणून दिली होती. तालुयातील कोंडोली ह्या गावी सुध्दा भेट घेऊन वृद्ध कलावंतांचा मागील पाच वर्षांपासून रखडलेला मानधनाचा प्रश्न तथा मासिक ५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात यावा, यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालण्यासंदर्भात विनंती करण्यात आली होती.stipend उपरोक्त मागण्यांच्या दिलेल्या निवेदना संदर्भात गृह विभागातील अवर सचिव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वयोवृद्ध कलावंतांच्या रास्त मागण्याची व इतरही प्रलंबित असलेल्या मागण्या निदर्शनास आणून दिल्याने ना. फडणवीस यांच्या पुढाकाराने १६ मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठकीत शासन निर्णय जारी होऊन राज्यातील वृद्ध कलावंतांना ५ हजार रुपये मासिक मानधन सरसकट देण्यात येण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे.